तयां संतांचे महिमान । काय म्हणाैनि वर्णावे ।।2।।

    18-Jun-2026
Total Views |
 
 

saint 
अगदी चक्रवर्ती राजेमहाराजेसुद्धा या अलाैकिक ‘श्रीमंती’चे दान देण्यात असमर्थ असतात. परंतु, हे आत्मज्ञान परमेश्वरी कृपाप्रसादाने संत सहज देऊ शकतात. ज्या परब्रह्माला वेद, श्रुती आणि स्मृतीही जाणू शकत नाहीत आणि जे त्रैलाेक्यातआगळेवेगळे आहे ते साधुसंतांच्या कृपेनेच भक्तांना प्राप्त हाेऊन अंतरात स्थिरावू शकते. त्यांच्या कृपेमुळे मायेच्या बंधनातून मुक्त हाेता येते. एका अभंगात साधुसंगे मानसी राम दाटे । मायासिंधू तात्काळ सर्व आटे ।। जेथे तेथे अच्युतानंत भेटे । ब्रह्मानंदे सर्वदा पूर लाेटे ।। राम ध्यातां हाेसी राम आता । गंगा सिंधू हाेय सिंधुसि मिळता ।। अशा शब्दात श्री समर्थांनी साधूंच्या संगतीचे महत्त्व वर्णन केले आहे.
 
संतसहवासाने माया आटून राम प्रीती दाटून येते. ब्रह्मानंद प्राप्त हाेऊन ठायी ठायी असलेल्या परमात्मस्वरूपाचा प्रत्यय येताे आणि जशी गंगा सिंधू नदीला मिळाली की, गंगासुद्धा सिंधुरूप हाेते, तसे संतांच्या आशीर्वादाने रामाची भक्ती करता करता भक्त स्वत:च रामरूप हाेऊन जाताे.संतस्तवन या पाचव्या समासाचा उपसंहार करताना म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, की ज्यांच्या कृपेने परमात्मा प्रगट हाेताे अशा संतांचा महिमा काेणतीही उपमा दिली,क तरी वर्णन करून सांगता येणे अशक्य आहे. ताे महिमा आपण अंत:करणानेच जाणून घ्यावा आणि त्यांचा सहवास प्राप्त करून घ्यावा हाच खरा मार्ग आहे.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 822016299