रेशन दुकानांमध्ये धान्यच उपलब्ध हाेत नसताना रेशन दुकानांमधून एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांच्या धान्य वितरणासाठी राज्य सरकारने 15 जून ही मुदत दिली आहे. मात्र, पुणे शहरात अद्याप मे महिन्याचे धान्य वितरण पूर्ण झालेले नाही आणि जून महिन्याचे धान्य रेशन दुकानांपर्यंत पाेचलेच नसल्याची ध्नकादायक माहिती समाेर आली आहे. अशा परिस्थितीत येत्या अवघ्या तीन दिवसांत धान्य वाटप पूर्ण करणे अशक्यप्राय झाले आहे.पुणे शहराचे अन्नधान्य पुरवठा अधिकारी प्रशांत खताळ यांनी शहरात 65 ट्नके धान्याची विक्री झाल्याचा दावा केला, तर विभागीय आयु्नत कार्यालयाच्या (पुरवठा शाखा) अधिकृत शासकीय अहवालानुसार पुणे शहरात जून महिन्याचे केवळ 33.62 ट्नके धान्य पाेहाेचले असून, त्याचे वितरण झाले आहे. शासकीय स्तरावर हा विराेधाभास दिसून येत आहे.
विभागीय आयु्नत कार्यालयाच्या अहवालानुसार पुणे शहराच्या तुलनेत पुणे ग्रामीण भागातील कामगिरी चांगली असली तरी अंतिम मुदतीच्या आत 100 ट्नके वाटप पूर्ण करणे कठीण आहे. पुणे शहरात धान्याचे दरमहाचे वाटप 6,946 टन असून, मे महिन्यात 95.22 ट्नके वितरण, तर जूनमध्ये 33.62 ट्नके वितरण झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची सरासरी ट्नकेवारी 74.70 आहे.प्रभारी विभागीय उपायु्नत (पुरवठा) दिनेश तावरे यांनी पुणे, सातारा, सांगली, साेलापूर आणि काेल्हापूरच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना तातडीचे पत्र पाठवले आहे. केंद्राने 15 जून हीच अंतिम मुदत दिली असून, मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे काेणत्याही परिस्थितीत ई- पाॅस मशीनद्वारे विहीत मुदतीत वितरण पूर्ण करून काेणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.