नात्यांमध्ये येऊ लागले हिशेब काेणी किती दिले? काेणाला किती मिळाले? काेणाला काय द्यायचे? काेणाकडून घ्यायचे आहे? आजकाल अशाच ताण्याबाण्यांमध्ये गुरफटून आपण प्रत्येक नात्याला माेजत आहाेत.नात्यात हिशेबी (‘कॅलक्युलेटिव्ह’) बनत चाललाे आहाेत. सध्या मतलबी जगात नातेही मतलबी बनत आहे. आपणही खूप व्यावहारिक, हिशेबी हाेत आहाेत. त्यामुळे नात्यांमधील आपलेपणा, जिव्हाळा, प्रेम हरवत चालले आहे.नात्याला ताेलू लागलाे पैशाच्या दृष्टिकाेनातून आपण त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी आपल्याला काय दिले? बाळाच्या हातात फक्त 100 रुपयांची नाेट ठेवली. मग ते आपल्या घरी आल्यावर आपण तरी एवढा विचार कशाला करायचा? आपणही तसेच करू, जसे त्यांनी केले हाेते. प्रत्येक नाते आता पैशाच्याच दृष्टिकाेनातून ताेलले जाऊ लागले. प्रेम, स्नेह, आपलेपणा तर जणू आता जुन्या काळातील गाेष्टी झाल्या.
नाती केवळ गरजेपुरतीच त्यांच्याशी संबंध ठेवून आपल्याला काय फायदा हाेणार? त्यांच्याकडे ना पैसा, ना त्यांची तेवढी ओळख आहे, जी आपल्याला कधी कामी येईल, असा लाेक विचार करीत आहेत. अनेक जण फ्नत गरज आणि स्वतः चा फायदाच पाहतात. अशाच लाेकांना भेटतात, ज्यांच्यापासून काहीतरी फायदा हाेऊ शकताे.अडचणीच्या वेळी काेण किती कामी येऊ शकते, याचा विचार हाेताना दिसताे. जसे की काेण रेल्वेचे रिझर्वेशन करून देऊ शकते? काेण हाॅस्पिटलचे बिल कमी करू शकते? काेण आपल्याला संकटातून बाहेर काढू शकते? काेणाची किती ओळख आहे, काेणाची किती माेठ्या अधिकाऱ्यांसाेबत ओळख आहे आणि वरपर्यंत वशिला आहे... या सर्व गाेष्टी आता अधिक महत्त्वाच्या बनल्या आहेत.समजूतदारपणे अंतर निर्माण हाेते पूर्वी दूरच्या नात्यातील लाेकांनाही सख्ख्या नातेवाइकांइतकेच आदर, प्रेम दिले जायचे. परंतु, आता विचार हाेताे, की जितके जास्त संबंध ठेवू, तितकी कटकट, झंझट वाढेल. इतका वेळ काेणाकडे आहे. त्यापेक्षा हळूहळू अंतर वाढवणे हेच बरे, असा विचार केला जाताे.
अत्यंत हिशेबी पद्धतीने आपण अंतर वाढवताे. जेणेकरून आपल्याला त्या नात्यांशी जाेडलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार नाहीत.पैसा, यशामुळे बदलतात नात्यांबद्दल दृष्टिकाेन व्य्नती जेव्हा मित्र-नातेवाइकांपेक्षा जास्त पैसे कमावू लागते किंवा जास्त यश मिळवते, तेव्हा तिच्यातील अहंकारही डाेके वर काढू लागताे. अशा वेळी व्य्नती नात्यांकडे संशयाच्या नजरेने पाहते.व्य्नतीला वाटते, की आपल्या यशामुळे आणि पैशामुळेच हे सर्व लाेक आपल्याशी जाेडून राहू इच्छितात. समाजात या नकारात्मक विचारसरणीला खतपाणी घालणाऱ्यांचीही कमतरता नाही, म्हणूनच आपण हळूहळू स्वतःच आपल्या माणसांपासून दुरावू लागताे.काळाप्रमाणे बदलतात प्राधान्यक्रम वेळेसाेबत आपले प्राधान्यक्रमही बदलतात.आपल्या जुन्या घट्ट मित्रांपेक्षाही आपल्यासाठी ते लाेक अधिक महत्त्वाचे बनतात, ज्यांच्याकडून आपल्याला करिअर, व्यवसायात फायदा हाेऊ शकताे. आपण अशा लाेकांसाेबत वेळ घालवण्यात अधिक रस दाखवताे.