ओशाे - गीता-दर्शन

    18-Jun-2026
Total Views |
 

Osho 
 
ही निरपवाद घाेषणा आहे.‘मी आत जाऊन जाणून घेतले पण माणसाच्या अंतरी परमात्मा नाहीये’ असं म्हणणारी एकही व्य्नती माणसाच्या इतिहासात नाही ज्यांनी परमात्मा नाहीये असं म्हटलं ते कधी अंतरी गेलेच नव्हते. जे गेले त्या सगळ्यांनी असं सांगितलं की परमात्मा आहे. जर कुठले एखादे सत्य निरपवाद असू शकते तर ते हेच आहे की, मनुष्याचा स्वभाव परमात्माच आहे.लाेक परमात्म्याचा शाेध घेतात. पण ते कधीही शाेधू शकणार नाहीत. कारण तेच शाेधता येते, जे हरवलेले असते. जाे शाेधायला गेला आहे ताे स्वत:च परमात्मा आहे, मग कसा शाेधू शकेल? आपण जर परमात्म्याहून अलग असताे तर कुठे ना कुठे त्याला शाेधून काढले असतेच, कुठे ना कुठे आमने सामने भेट झाली असतीच, कुठे ना कुठे दृष्टादृष्ट झाली असतीच पण आपण स्वत:च परमात्मा असल्याने जाे परमात्म्याचा शाेध घ्यायला निघाला आहे.
 
त्याला अजून याचाच पत्ता नाहीये की ताे ज्याला शाेधत आहे ते त्याचे स्वत:चेच असणे आहे.हा तर आपला स्वभाव आहे. आपण त्याला कधी मुकू शकत नसताे, पण काय आश्चर्य! तेही आपण हरवून बसलाे आहाेत असं दिसतं, एरवी शाेधतच कशाला राहिलाे असताे? हरवू तर शकत नाही. मग आणखी काहीतरी वेगळे झालेले असू शकते. हरवण्याशी मिळते जुळते असले पाहिजे. ते म्हणजे विस्मरण, फर्गेटफुलनेस.आपण स्वभावाला हरवणे काही श्नय नाही. पण ताे विसरू मात्र शकताे. आपल्याला भूल पडलेली असणे मात्र श्नय आहे. अर्थातच विस्मरण झाले असले म्हणून काहीही फरक पडत नाही. आपण जे हाेताे तेच राहणार पण तरी आपण जे आहाेत ते आपण आपल्यालाच समजू शकत नाही आहाेत. आपण परमात्म्याला फ्नत विसरलाे आहाेत.