डाॅ. शिवाजीराव कदम यांचे कर्तृत्व हिऱ्यासमान झळाळते असून, त्यांचा सन्मान हा एका सुंदर, समृद्ध, प्रेरणादायी, अर्थपूर्ण जीवनप्रवासाचा गाैरव आहे.त्यांच्या आयुष्याचे माेल, उदारता, शिक्षण क्षेत्रातील याेगदान माेजणे म्हणजे आकाशाची उंची माेजण्याप्रमाणे आहे. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे, या उदात्त हेतूने डाॅ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 50 वर्षे ते सातत्याने कार्यरत आहेत.ते कुशल संघटक, प्रगत नेतृत्व, कृतिशील विचारवंत, विनम्र आणि संयत असून, अजातशत्रू व्य्नितमत्त्व हे त्यांचे वैशिष्ट्य आहे,’ असे गाैरवाेद्गार पद्मविभूषण डाॅ.रघुनाथ माशेलकर यांनी काढले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा (पुणे) आणि मनीषा प्रकाशन (मुंबई) यांच्या संयु्नत विद्यमाने भारती विद्यापीठाचे कुलपती डाॅ. शिवाजीराव कदम यांचा अमृत महाेत्सवी सन्मान व मानपत्र प्रदान समारंभ साेमवारी (दि. 15) आयाेजित करण्यात आला हाेता. डाॅ. कदम यांचा सन्मान पद्मविभूषण डाॅ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बाेलत हाेते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर हाेते. एस. एम. जाेशी सभागृहात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.प्रमुख पाहुणे म्हणून सातारच्या रयत शक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ उद्याेजक सतीश मगर, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, माजी मंत्री, आमदार विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
डाॅ. शिवाजीराव कदम यांच्या जीवनावरील ‘ज्ञानतपस्वी’ या मधुकर भावे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे लाेकार्पण या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे अध्यक्ष सचिन इटकर, सचिव रवींद्र डाेमाळे, उपाध्यक्ष रजनी कानडे, लता राजगुरू मंचावर हाेते.फुले पगडी, शाल, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.डाॅ. रघुनाथ माशेलकर पुढे म्हणाले, डाॅ. शिवाजीराव कदम यांच्या जीवनाचा 75 वर्षांचा प्रवास ही खऱ्याखुऱ्या शहाणपणाची संपत्ती आहे. सत्काराला उत्तर देताना डाॅ.शिवाजीराव कदम म्हणाले, ‘आजच्या सत्काराने मी खराेखरच भारावून गेलाे आहे.
जीवनातील या प्रवासात पूजनीय आई-वडील व बंधू डाॅ. पतंगराव यांचे भरभरून आशीर्वाद लाभले आहेत. शिक्षण आणिकार्यकर्तृत्वामुळे माणूस जीवनात माेठा हाेताे, हे मूल्य रयत शिक्षण संस्थेने माझ्यात रुजवले आहे. हा दिवस माझ्या पाच दशकांच्या ज्ञानयज्ञाची तपश्चर्या आहे.गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन या हेतूने भारती विद्यापीठाच्या माध्यमातून मी सातत्याने कार्यरत आहे.’ अध्यक्षपदावरून बाेलताना विद्याधर अनास्कर म्हणाले, ‘डाॅ.शिवाजीराव कदम यांचा सन्मान हा गुरुतुल्य व्य्नतीचा ऋषितुल्य व्य्नतीच्या हस्ते हाेणारा गाैरव आहे.’ यावेळी चंद्रकांत दळवी, विश्वास पाटील, सतीश मगर, डाॅ. विश्वजीत कदम यांनीही मनाेगत व्य्नत केले.