डायबिटिसच्या रुग्णांसाठी देखील पिस्ता सुपरफूड आहे!

    18-Jun-2026
Total Views |
 

Health 
 
माेनाे व पाेलिअनसॅच्युरेटेड फॅट्सने समृध्द असलेल्या पिस्त्याचे सेवन केल्यास मधुमेहाचा धाेका 27 % नी कमी हाेताे. अशा प्रकारच्या फॅट्सचे आराेग्यासाठी अनेक फायदे आहेत. शिवाय, तज्ज्ञांनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी शिफारस केलेल्या मेडिटेरिनियन डाएटचा पिस्ता हा एक महत्त्वाचा भाग आहे. अनसॅच्युरेटेड फॅट, फायबर, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि जीवनसत्वांनी भरपूर असलेला पिस्ता मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासहीत अत्यंत उपयुक्त ठरू शकताे.पिस्ता हा शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असलेल्या पहिल्या 50 खाद्यपदार्थांच्या यादीत समाविष्ट आहे. हे गुणधर्म इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास, स्वादुपिंडाच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसानीपासून संरक्षण करण्यास, काेलेस्ट्राॅलची पातळी सुधारण्यास आणि हायपरग्लायसेमिया (वाढलेली साखर) व्यवस्थापित करण्यास मदत करतात. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात पिस्त्याचा समावेश केल्यास फायदे शकतात.
 
पिस्त्यामध्ये कॅलरी कमी असतात : एका अभ्यासानुसार, इतर ड्रायफ्रुट्सच्या तुलनेत पिस्त्यामध्ये कॅलरी आणि चरबीचे प्रमाण कमी असते. पिस्ता खाल्ल्याने पाेट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. परिणामी, दिवसभरात शरीरात कमी कॅलरी जातात.
 
कमी ग्लायसेमिक इंडेक्स : ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असताे, ते पदार्थ रक्तातील ग्लुकाेजच्या पातळीत हाेणारी अचानक वाढ राेखतात. यामुळे व्यक्तीला दीर्घकाळ भूक लागत नाही आणि साखरेची पातळी स्थिर राहते. पिस्त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जेवणानंतर वाढणारी साखरेची पटली नियंत्रणात राहते.