स्वप्नांचा व्यापार हे शिक्षण व्यवस्थेचे कटू सत्य

    18-Jun-2026
Total Views |
 


education
 
 
 
पूर्वी शालेय सुट्ट्या म्हणजे आनंद आणि आरामाची चर्चा व्हायची. पण, आता हा काळ निकालांचा हंगाम बनून गेला आहे. यासाेबतच मानसिक तणाव आणि निराशेचा हंगामही सुरू हाेताे. दरवर्षी लाखाे मेडिकल, इंजिनीअरिंगच्या प्रवेश परिक्षांसाठी मेहनत करतात. पालक आयुष्यभराची बचत काेचिंग ्नलासेसवर खर्च करतात. तरीही शेवटी एकच प्रश्न उभा राहताे की, या सगळ्याचा खराेखर याेग्य माेबदला म्हणजे निकाल मिळताे का? विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवले तरीही हव्या असलेल्या संस्थेत किंवा क्षेत्रात प्रवेश मिळत नाही. मग ही शिक्षण व्यवस्था आता यशाचा मार्ग राहिली नाही का? की ती एक महागडी लाॅटरी बनली आहे? मार्कांची किंमत हाेतेय कमी आजच्या काळात 99% किंवा 95% गुण मिळणे सामान्य झाले आहे. गुण ही केवळ एक शर्यत बनले आहेत, ज्यामध्ये मुलांना सतत पळवले जात आहे. एकाच परीक्षेत हजाराे विद्यार्थी खूप उच्च गुण मिळवतात.
 
परंतु, मर्यादित सरकारी शिक्षणसंस्था व मर्यादित जागांमुळे प्रत्येकाला याेग्य संधी मिळणे शक्य हाेत नाही. म्हणजेच हे स्पष्ट आहे की, मार्कांची संख्या वाढत आहे.परंतु, संधी कमी हाेत आहे. या परिस्थितीला - मार्कांची महागाई म्हणता येईल, जिथे मार्कांची किंमत कमी हाेत चालली आहे.काेचिंग बनला माेठा व्यवसाय आजच्या काळात काेचिंग हा एक माेठा व्यवसाय बनला आहे. दाेन वर्षांच्या अभ्यासासाठी लाखाे रुपयांचा खर्च हाेताे.माता-पिता दागिने गहाण ठेवतात, जमीन विकतात, कर्ज घेतात, आपल्या मुलाच्या भविष्यासाठी सर्व काही पणाला लावतात, तरीही त्यांना गुणांची, प्रवेशाची काेणतीही खात्री मिळत नाही.काेचिंग सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवले जात नाही, तर त्यांना केवळ प्रश्न साेडवण्याच्या पद्धती (ट्रिक्स)शिकवल्या जातात. ज्यामुळे ते एखाद्या मशीनसारखी कार्यशैली आत्मसात करतात.
 
परंतु, आयुष्यात सर्जनशीलता आणि नवीन विचारसरणीसाठी जागा कमी उरते.मुलांवर लहान वयापासूनच दबाव या संपूर्ण प्रक्रियेत सर्वांत माेठे नुकसान मुलाच्या बालपणाचे हाेते. लहान वयापासूनच दबाव सुरू हाेताे. खेळण्याचा वेळ कमी हाेताे. स्वतंत्रपणे विचार करण्याची संधी मिळत नाही आणि मूलं केवळ स्पर्धेच्या शर्यतीत ओढले जाते. अशा प्रकारे आपण भविष्यातील निर्माते किंवा शास्त्रज्ञ तयार करत नसून, केवळ परीक्षेसाठी तयार झालेले लाेक तयार करत आहाेत.विद्यार्थ्यांचे टाेकाचे निर्णय ही गंभीर समस्या दरवर्षी अनेक विद्यार्थी निराशेमुळे टाेकाचे निर्णय घेतात.ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. अपेक्षेचे ओझे, तुलनेचा दबाव, अपयश सहन करण्याची असमर्थता त्यांना आतून ताेडून टाकते.खरा दाेष व्यवस्थेचा खरी गाेष्ट ही आहे की, समस्या मुलांमध्ये नाही तर आपण तयार केलेल्या व्यवस्थेत (सिस्टीममध्ये) आहे; जी केवळ गुणांना महत्त्व देते, मानवी मूल्यांना नाही.
 
या परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे, हा माेठा प्रश्न आहे. प्रत्येक मूल वेगळे असते. पालकांनी मुलांची आवड, क्षमता ओळखून त्याला शिक्षण क्षेत्र निवडूद्यावे. मार्कांपेक्षा समज अधिक महत्त्वाची आहे, कारण गुण काही काळापुरते असतात. पण, समज आयुष्यभर कामाला येते.काैशल्य शिक्षणावर भर हवा मुलाला आयुष्यासाठी आवश्यक असणारी जीवन काैशल्येही शिकवली पाहिजेत. स्वयंअध्ययन (सेल्फ-स्टडी) आणि नाॅलेज (ज्ञान) विकसित केले पाहिजे, त्याचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आजच्या काळात डिग्रीपेक्षा काैशल्य (स्किल) अधिक महत्त्वाचे आहे. म्हणूनच संवाद काैशल्य, समस्या साेडवण्याची क्षमता, वेळेचे व्यवस्थापन, सर्जनशीलता, जबाबदारी, स्वातंत्र्य, टेक्निकल काैशल्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी काेचिंगवर वारेमाप खर्च करण्याऐवजी समजूतदारपणाने गुंतवणूक केली पाहिजे. ती रक्कम भविष्यासाठी वाचवता येऊ शकते.