‘आईज अ‍ॅडव्हर्टायझिंग’चे ईश्वर दिघे यांचे निधन

    18-Jun-2026
Total Views |
 
 

crime 
पुण्यातील प्रतिष्ठित जाहिरात एजन्सी ‘आईज अ‍ॅडव्हर्टायझिंग’चे ईश्वर दिघे यांचे साेमवारी सकाळी हृदयाघाताने निधन झाले. ते 79 वर्षांचे हाेते. त्यांच्या निधनाने पुण्याच्या जाहिरात विश्वाने एक बहुमुखी आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. आपल्या जीवनात शिस्त, वक्तशीरपणा व कर्मनिष्ठेला सर्वाेच्च महत्त्व देणारे ईश्वर दिघे यांची जाहिरात क्षेत्राशी एक विशिष्ट ओळख हाेतीत्यांचे व्य्नितमत्त्व व कार्यशैली त्यांना इतरांपेक्षा वेगळे करीत हाेती. ते रामा (रिजनल अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग) संस्थेचे भक्कम आधारस्तंभ हाेते.
जाहिरात क्षेत्राच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा हाेता.त्यांच्या निधनानंतर कुटुंबात त्यांचे पुतणे, जावई, भाचे, तसेच ‘आईज अ‍ॅडव्हर्टायझिंग’चा संपूर्ण कर्मचारी वर्ग शाेकाकुल आहेत. त्यांच्या स्मृती व त्यांनी स्थापन केलेली मूल्ये सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहतील.