साहसी खेळांच्या शाैकिनांसाठी धाेक्याची घंटा वाजवणारी एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना ब्राझीलमध्ये उघडकीस आली आहे. साओ पावलाे राज्यातील प्रसिद्ध स्केलेटन ब्रिजवर बंजी जंपिंग करताना आयाेजकांच्या गंभीर निष्काळजीपणामुळे 130 फूट उंचीवरून पडून एका 21 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये क्रू सदस्यांनी सुरक्षेसाठी सेफ्टी काॅर्ड न बांधता मुलीला पुलावरून खाली फेकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मृत मुलीची ओळख मारिया एडुआर्डा राॅड्रिग्स डी फ्रेटास (वय 21) अशी आहे. ती एका खासगी कंपनीने आयाेजित केलेल्या बंजी जंपिंग कार्यक्रमात सहभागी हाेण्यासाठी तिथे आली हाेती.
व्हिडिओ फुटेजमध्येअसे दिसून येते की, कंपनीचे कर्मचारी मारियाला पुलाच्या टाेकापर्यंत घेऊन जातात आणि नंतर तिला उडी मारण्यासाठी साेडून देतात. कर्मचाऱ्यांना कल्पना नव्हती की अत्यंत आवश्यक असलेला सुरक्षा दाेर मुलीच्या शरीराला बांधलेला नव्हता. यामुळे मारिया थेट जमिनीवर पडली आणि जागीच मरण पावली. ब्राझील सरकारने निष्काळजीपणाचे हे गंभीर प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. स्थानिक पाेलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत हा कार्यक्रम आयाेजित करणाऱ्या खासगी कंपनीच्या 6 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.