जीवनातील प्रत्येक क्षणाचा सदुपयाेग केल्यामुळेच माणूस संपूर्णत्व मिळवू शकताे.जीवनाची सार्थकता तेव्हाच आहे जेव्हा आपण वेळेची किंमत समजून घेत आचरण करताे. यामुळेच सर्व धर्माचार्य, संत महात्मे आपल्या उपदेशांमधून नेहमी हा संदेश देत आले आहेत की, माणसाचे आयुष्य मर्यादित असल्यामुळे माणसाने आजचे काम उद्यावर ढकलू नये. जीवनात वेळेची किंमत जाे जाणताे ताेच आध्यात्मिक व भाैतिक प्रगती करताे.सर्व संप्रदायांच्या धर्मग्रंथांमध्ये मानवी जीवन दुर्लभ आणि अनाेखे सांगितले गेले आहे. आदि शंकराचार्यांनीही अशा प्रकारे सांगितले हाेते, ‘अरे मानवा, न जाणाे किती पुण्यांमुळे पशूऐवजी ही मानवी याेनी प्राप्त झााली आहे.जर तू हे फक्त भाेग-विलास आणि ऐश्वर्यांत घालवले तर अखेरीस डाेके बडवून घेत रडण्याशिवाय तुझ्या हाती काही उरणार नाही.
मानवी जीवनाचा प्रत्येक क्षण माेलाचा आहे. त्यामुळे ते सद्गुण ग्रहण करण्यात, ईश्वरभक्ती करण्यात आणि सेवा-पराेपकारासारखी सत्कर्मांत व्यतीत करण्यातच भलाई आहे.याचप्रमाणे राजा विक्रमादित्याला संस्कृत श्लाेक प्रत्यर्ह प्रत्यवेक्षत नरच्चरितमात्मन:। किन्नु मे पशुभितुल्यं किन्नु सत्पुरुषैरिव। अत्यंत प्रिय हाेता. ज्याचा अर्थ माझ्या या बहुमूल्य जीवनाचा जाे दिवस जात हाे ताे पुनहा परतून येणार नाही त्यामुळे राेज आपण हे चिंतन करायला हवे की, आजचा दिवस गेला आहे ताे पशुसारखा गेला की,त्पुरुषाप्रमाणे, असा आहे.राजा विक्रमादित्य राेज सकाळी बिछाना साेडताच ईश्वराची प्रार्थना करीत असत की, त्याचा ताे दिवस पूर्णरुपाने कर्तव्यपालन करण्यात लाेकांचे हित चिंतण्यात व ईश्वराच्या पावन स्मरणात जावा.