विचारांचा संयम ठेवल्यास सुखशांती मिळेल

    16-Jun-2026
Total Views |
 

thoughts 
 
 
भगवान बुद्ध श्रावस्तीजवळ थांबले हाेते. एक दिवस एक श्रीमंत माणूस त्यांच्या दर्शनासाठी पाेहाेचला. जाडजूड शरीरामुळे ताे व्यवस्थित चालूही शकत नव्हता. ताे नम्रपणे म्हणाला, ‘भगवंत, माझे शरीर अनेक विकारांचा अड्डा झाले आहे. रात्री झाेप येत नाही व दिवसाही सुखाने बसू शकत नाही. मला राेगम ु्नतीचे साधन सांगण्याची कृपा करावी.’ भगवान बुद्ध म्हणाले, ‘भरपूर जेवण केल्यामुळे येणारा आळस, झाेप, भाेग, अनंत इच्छांची कामना, शारीरिक श्रमाचा अभाव ही सारी राेग उत्पन्न हाेण्याची कारणे आहेत. जिभेवर नियंत्रणेवल्यामुळे, साधे सात्त्विक जेवण घेतल्यामुळे, शारीरिक श्रम केल्यामुळे, सत्कर्मांत राहिल्यामुळे व आपल्या इच्छा मर्यादित केल्यामुळे हे राेग आपाेआपनष्ट हाेतात. अमर्याद इच्छा शरीर जर्जर करून टाकते. यासाठी त्या साेडून द्या.’ त्या श्रीमंताने त्या वचनांचे पालन करण्याचा संकल्प केला आणि परत गेला. एका महिन्यातच ताे व्यवस्थित झाला. ताे बुद्धांकडे येऊन म्हणाला, ‘शरीराचा राेग तर आपल्या कृपेने दूर झाला. आता चित्ताचे प्रबाेधन कसे हाेईल?’ बुद्ध म्हणाले, ‘उत्तम विचार कर, उत्तम वाग आणि उत्तम लाेकांची संगत कर. विचारांचा संयम चित्ताला शांती-संताेष देईल.’ ताे श्रीमंत बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर राहू लागला.