सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळला राॅयल बंगाल वाघ : संगमेश्वरच्या वनक्षेत्रात वावर

    11-Jun-2026
Total Views |
 
 

tiger 
एकेकाळी वृक्षताेड, मानवी अतिक्रमण आणि पर्यावरणीय ऱ्हासामुळे संकटात सापडलेल्या सह्याद्रीच्या जंगलाला आता नवजीवन मिळाल्याचे चित्र आहे.संगमेश्वर तालुक्यातील एका खासगी वनक्षेत्रात राॅयल बंगाल वाघाची उपस्थिती नाेंदवली गेली असून, कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालेल्या या दुर्मीळ दृश्यामुळे वनसंवर्धन क्षेत्रात आनंद आहे. गेली तब्बल 18 वर्षे या जंगलाचे नैसर्गिक वैभव पुन्हा उभे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू हाेते. वृक्षताेड राेखणे, स्थानिक वनस्पतींचे संवर्धन आणि वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करणे या उद्दिष्टाने अनेक हात एकत्र आले. अखेर या प्रयत्नांना यश मिळाल्याचे संकेत वाघाच्या रूपाने मिळाले आहेत. वन्यजीव अभ्यासकांच्या मते, राॅयल बंगाल वाघाचे अस्तित्व म्हणजे जंगलाच्या आराेग्याचा महत्त्वाचा मापदंड.
 
अन्नसाखळीतील सर्वाेच्च स्थानावर असलेला हा शिकारी ज्या जंगलात वावरताे, तेथील परिसंस्था सक्षम आणि संतुलित असल्याचे मानले जाते. त्यामुळे संगमेश्वरमध्ये झालेली ही नाेंद संपूर्ण परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनाची साक्ष आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, काेयना अभयारण्यात सुरू असलेले व्याघ्र संवर्धन आणि स्थानिक स्तरावर केलेल्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागल्याचे मानले जाते. या घटनेमुळे खासगी वनक्षेत्रांच्या संवर्धनालाही नवी ओळख मिळाली.सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा एकदा अशा वाघाची चाहूल लागल्याने निसर्गप्रेमींसाठी ही घटना आशेचा किरण ठरली आहे. त्यामुळे आता निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अशाप्रकारचा वाघ आढळून आल्