त्याचा विचार करून उलटे करावे तरी त्यांचे बाेलणे काही सुटत नाही.चांगले कपडे घालावे तर म्हणतात फिल्मस्टार झालात वाटतं, हिराे हाेऊन काय दिवे लावणार? साधे कपडे घालावेत तर ते म्हणतात मी मेल्यावर असले कपडे घाला. अजून मी जिवंत आहे ताेपर्यंत जरा रंगढंग करून घ्या. आता मी काय करावे अशी माेठी पंचाईत मला पडली आहे. मी म्हटले, एखादे वेळी नागडे राहून पाहिले की नाही? तिसरा तर काहीच मार्ग नाहीये. एकदा नागडे राहून पहा काय हाेते ते यावर ताे म्हणाला, आपण पण काय सांगताहात एकदम गळा कापतील माझा! आपण सगळे असेच हुडकत असताे. काेणतीही खुंटी चालते. खुंटी नाहीच मिळाली तर आपण स्वत:च नव्या गाडताे. अशांत हाेण्याचा आपला अभ्यास भरपूर चालत असताे. अशांत हाेण्यासाठी, क्रुद्ध हाेण्यासठी, संत्रस्त हाेण्यासाठी आपली माेठीच याेगसाधना चालते.
आज जर संत्रस्त नाही झालाे तर दिवस फुकट गेला असेच आपल्याला हाेत असते. कित्येकदा अक्षरश: असेच हाेते. आपण संत्रस्त झालाेत तर आपण आहाेत हे कळतं तरी आपल्याला.नाही तर कळायला काय साधन? मग माेठमाेठे त्रागे करून टाकायचे म्हणजे ते आपल्या अस्तित्वाचे पुरावे हाेऊन जातात. त्रासाचे जेवढे माेठे जंजाळ तेवढा आपण माेठे ठरताे. आपणही कुणी व्ही. आय. पी. ठरताे. माणूस जेवढा माेठा तेवढा त्रास जास्त असताे ना. मग छाेटा छाेटा माणूसही छाेट्या छाेट्या त्रासाचे वर्णन राईचा पर्वत करून सांगत असताे. ते त्रास माेठे करून दाखवीत असताे. त्यांच्यामध्ये मी उभा करायला बरे असते. हा सगळा अभ्यास चालताे.अभ्यासाविना यापैकी काहीही हाेऊ शकत नाही. हेसुद्धा सगळे अभ्यासाचेच फळ आहे.