डिसेंबर 2027 पर्यंत मराठी भाषा भवन पूर्णत्वास : मराठी भाषा मंत्री उदय सामंत

    11-Jun-2026
Total Views |
 

marathi 
 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या संवर्धनासाठी आणि मराठीचे विविध पैलू जनसामान्यांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत असून, मरीन ड्राइव्ह येथे उभारण्यात येत असलेले मराठी भाषा भवन डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियाेजन असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.मरीन ड्राइव्ह येथे सुसज्ज असे मराठी भाषा भवन उभारण्यात येत असून, सामंत यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डाॅ. नामदेव भाेसले, संचालक अरुण गीते, संचालक रूपेंद्र माेरे, अवर सचिव देशमुख, विश्वकाेशचे सचिव देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता फेगडे आदी उपस्थित हाेते.
 
राज्यात सात ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्रे सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही सात केंद्रे रत्नागिरी, नाशिक, पुणे, काेल्हापूर, छत्रपतीसंभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत उभारली जाणार आहेत. मराठी भाषा, विविध बाेलीभाषा, साहित्य आणि संशाेधनास चालना देण्यासाठी भाषा विकास केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतील. संशाेधक, साहित्यिक, विद्यार्थी; तसेच नव्या पिढीतील अभ्यासकांना या केंद्रांचा माेठा लाभ हाेईल, असा विश्वास सामंत यांनी व्य्नत केला.