जास्त मेहनत करीत असते शरीर : आपल्या शरीरात एक ऑटाेमॅटिक कूलिंग सिस्टीम असते, जी शरीराचे तापमान सामान्य ठेवत असते. शरीर उष्णता घामावाटे बाहेर काढते. घाम त्वचेपर्यंत रक्त पंप झाल्यामुळे निघत असताे. जेवढे शरीराचे तापमान वाढते हृदयाला तेवढेच रक्त पंप करावे लागते.यामुळे चरबी व कॅलरीचा खप वेगाने हाेत असताे. तज्ज्ञांच्या मते तीव्र उन्हात व्यायाम केल्यास चरबी व कॅलरी वेगाने जळते.व्यायाम करताना आपल्या शरीराचे तापमान वेगाने वाढते व ते सामान्य तापमानावर येण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. हवेत आर्द्रता असल्यामुळे घाम उशिरा सुकताे.यामुळे लवकरच थकवा येऊ लागताे. ओठ काेरडे पडतात, तहान लागत असेल वा थकवा जाणवत असेल तर व्यायाम थांबवून आराम करावा. असे न केल्यास वेदना, चक्कर व अस्वस्थता वाढू शकते.
सहजतेने कराल व्यायाम पाणी पीत राहा : घाम जाण्याचा अर्थ हा नव्हे की, शरीरात पाणी कमी हाेत आहे, पण तरीही पाणी पीत राहायला हवे. व्यायाम सुरू करण्याच्या सुमारे अर्धा तास आधी एक माेठा ग्लास पाणी प्या. यामुळे व्यायाम करताना शरीरात पाण्याची कमतरता हाेणार नाही. दर 20 मिनिटांनंतर थाेडेसे पाणी प्या.घाम निघाल्यामुळे इले्नट्राेलाइट्सचे संतुलन कमी हाेते, जे पूर्ण करण्यासाठी थाेडे खाणे- पिणेही आवश्यक असते. एनर्जी ड्रिंक घेत असाल तर कमी प्रमाणातच घ्यावे. चहाकाॅफीसारखी कॅफीनयुक्त पेप घेणे टाळावे.
वेग कमी करा : वेगवान व्यायाम केल्यास वा धावल्यास लवकर थकवा येऊ लागताे. उन्हाळा कडक असेल तर वेगाने धावू नका. ज्यामुळे हृदयाची धडधड असामान्य हाेऊ शकते असे व्यायाम करणे टाळावे. पाेहणे वा याेग करणे उत्तम ठरेल.ब्रेकमधये एखाद्या सावलीच्या जागी बसावे.सकाळी लवकर वा रात्री व्यायाम करावा.
खाणे-पिणे याेग्य राखा : पालेभाज्या, फळे, बीन्स, मटार, मेवा, चिया सीड्स व सीताफळाच्या बिया खा. तज्ज्ञांच्या मते सकाळी कठाेर व्यायाम करीत असाल तर रात्री थाेडे लवकर आणि पाैष्टीक खा. यामुळे व्यायाम करताना ऊर्जा टिकून राहते. तीन वेळा खाण्याऐवजी पाच वेळा कमी प्रमाणात खा. सुती कपडे घालून व्यायाम करा.