काेल्हापूर, पुण्यात एफडीएची धडक कारवाइ

    11-Jun-2026
Total Views |
 

FDA 
 
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) काेल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात दाेन कारवाया करत एकूण 24 लाख 81 हजार रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.येथील रविवार पेठ परिसरातील मेडटॅब्स फार्मा प्रा.लि. येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. तपासादरम्यान माेठ्या प्रमाणात अ‍ॅलाेपॅथिक औषधे, विशेषतः प्रतिजैविक (अँटिबायाेटिक) इंजेक्शन्सचा साठा आढळून आला. या औषधांच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक परवाने व वैध कागदपत्रे नसल्याने औषधे व साैंदर्यप्रसाधने अधिनियम- 1940 मधील तरतुदींचे उल्लंघन प्रकरणी औषधांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, उर्वरित 29 प्रकारच्या औषधांचा 13.62 लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
 
दुसऱ्या कारवाईत पुणे जिल्ह्यातील वडकी येथे असलेल्या सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या गाेदामाची तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान रेक्टीन प्लस टॅब्लेट या शेड्यूल एचअंतर्गत येणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या पॅकेजिंगवर औषधाच्या वापराबाबत जाहिरात करण्यात आल्याचे आढळून आले. अशाप्रकारची जाहिरात औषधे व साैंदर्यप्रसाधने नियम-1945 मधील तरतुदींशी विसंगत असल्याने संबंधित औषधाचा सुमारे 11.19 लाखांचा साठा जप्त करण्यात आला. औषध उत्पादक व विक्रेत्यांनी सर्व कायदे व नियमांचे काटेकाेर पालन करावे. राज्यात औषध उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्री क्षेत्रातील काेणतेही बेकायदेशीर काम करणाऱ्या व्य्नती, संस्था किंवा कंपन्यांवर कठाेर व सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा आयु्नत तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.