मायक्राे ड्रामा लिहून लेखकांची कमाई लाखाे

    11-Jun-2026
Total Views |
 

drama 
 
लेखक म्हणून माझ्या प्रदीर्घ अनुभवात लेखकांसाठी इतकी प्रचंड मागणी असल्याचे मी पहिल्यांदाच पाहत आहे, असे ज्येष्ठ दूरचित्रवाणी लेखक संजय भाटिया यांनी नमूद केले. एन्काऊंटर या गुन्हेगारी मालिकांचे लेखन करणारे भाटिया यांनी अलीकडेच मायक्राे-ड्रामा क्षेत्रात पदार्पण केले आहे. दुसरीकडे, मायक्राे-ड्रामा प्समधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्षेत्रातील लेखकांचे मानधन प्रति मालिका 25,000 ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान असते. हे मानधन 3 ते 4 लाख रुपयांपर्यंतही जाऊ शकते.
दूरचित्रवाणीच्या तुलनेत कमी वेळ द्यावा लागत असणे आणि विविध विषयांना असलेली मागणी, हे लेखकांमध्ये या क्षेत्राविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण करणाऱ्या प्रमुख घटकांपैकी काही आहेत.
 
दूरचित्रवाणी मालिकांमध्ये जिथे टीआरपी हेच आशयाची पसंती ठरवतात, त्याच्या अगदी उलट; मायक्राे-ड्रामामध्ये लेखक विविध विषयांवर काम करू शकताे. सरासरी पाहता एका मायक्राेड्रामा मालिकेची निर्मिती 10 ते 15 दिवसांत पूर्ण हाेते. यामुळे लेखकांना नवनवीन प्रयाेग करण्यासाठी माेठा वाव मिळताे, असे सरस्वतीचंद्रसारख्या मालिकांशी संबंधित असलेले आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील अनुभवी लेखक शकेब सय्यद यांनी सांगितले.आजकाल अनेक नवाेदित लेखक मायक्राे ड्रामा क्षेत्रात येत आहेत. खरं तर मायक्राे ड्रामा क्षेत्रात लेखक आणि इतर सर्जनशील व्यावसायिकांची कमतरता आहे. दूरस्थ काम (रिमाेट वर्किंग) आणि जलद पेमेंटमुळे या क्षेत्राचे आकर्षण वाढले आहे, असे लेखकांचे म्हणणे आहे. मायक्राे ड्रामाने लेखकांच्या कामाची पद्धत विकेंद्रित केली आहे.
 
आज एक लेखक इंदूरमध्ये बसून मायक्राे ड्रामा मालिका लिहू शकताे आणि पैसे कमवू शकताे. तसेच या क्षेत्रात पेमेंट जलद मिळते. टीव्हीच्या (45 दिवसांच्या) तुलनेत मायक्राे ड्रामा लेखकांना एका महिन्यात किंवा त्याहून कमी काळात पेमेंट मिळते.निर्मात्यांच्या मते टीव्हीवरील अनुभवामुळे या लेखकांना या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यास मदत झाली आहे. मायक्राे ड्रामा जलद गतीने लिहिणाऱ्या लेखकांसाठी आणि तरुण निर्मात्यांसाठी एक माेठी संधी निर्माण करत आहेत. कारण हे स्वरूप वेग, आपलेपणा, कथाकथनातील चपळता, सततची उत्कंठावर्धक वळणे आणि दर 60 सेकंदाला प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याच्या क्षमतेला प्राेत्साहन देते, असे चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी कार्मिक फिल्म्सचे सहसंस्थापक आणि संचालक सुनील वाधवा म्हणाले. ते पुढे म्हणाले की, अनुभवी टीव्ही लेखक या गाेष्टी चांगल्या प्रकारे पार पाडतात