मुंबईच्या सातही धरणांतील पाणीसाठा खालावल्याने मुंबईकरांची चिंता वाढली

    11-Jun-2026
Total Views |
 
 

dam 
 
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालावल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. सध्या या धरणांत केवळ 40 दिवसांचा पाणीपुरवठा शिल्लक राहिल्याने महापालिकेने मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 10 ट्नकेपाणीकपात लागू केली आहे.ताज्या आकडेवारीनुसार या धरणांमध्ये केवळ 13.55 ट्नके पाणीसाठा शिल्लक आहे.अप्पर वैतरणा धरणाची पाण्याची पातळी खालावली आहे. लाेअर ड्राॅ डाऊन लेव्हलच्या खाली पाणी गेल्यामुळे महापालिकेला आता या धरणातील राखीव पाणीसाठ्यातून पाणी वापरण्याची वेळआली आहे. 2 जूनपासून या धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे.पाऊस नसल्यामुळे मध्य वैतरणा, भातसा, माेडक सागर, तानसा, विहार आणि तुळशी या सर्वच धरणांमधील पाण्याच्या पातळीत गेल्या 24 तासांत किंचित घट झाली आहे.मुंबईवर पाणीकपातीचे संकट ओढवू नये म्हणून महापालिका प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.