महाराष्ट्र रेल्वे फाटकमु्नत हाेण्यासाठी पायाभूत सुविधा उभाराव्यात : मुख्यमंत्री

    11-Jun-2026
Total Views |
 

CM 
 
अनेक वर्षांनंतरही रेल्वे फाटक समस्या कायम आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव गेले आहेत. त्यासाठी राज्यातील रेल्वे फाटकांजवळ त्वरित पायाभूत सुविधा उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (महारेल) करण्यात येणाऱ्या एकूण 131 पैकी पहिल्या टप्प्यात 65 कामांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महारेलच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले हाेते. राज्यात एकही रेल्वे मार्गावर फाटक राहता कामा नये.
 
महानगरांमध्ये रेल्वे मार्गांच्या आजूबाजूला असलेले वाढते शहरीकरण लक्षात घेता अशा भागात गरजेनुसार नागरिकांच्या सुलभ दळणवळणासाठी पायाभूत सुविधांची कामे हाती घ्यावीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या कामांसाठी हुडकाेकडून कर्ज घ्यावे. हुडकाेने बँकांकडून कर्ज न घेता वेगळी व्यवस्था उभारून बाजारातील स्पर्धेचा अंदाज घेत राज्य शासनाला दिलेल्या कर्जावरील व्याज कमी आकारावे. महारेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आणण्यासाठीची कार्यवाही गतीने पूर्ण करावी. महारेलने पूर्ण केलेल्या कामांचे बिल राज्य शासनाकडून तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.