आषाढी एकादशीला मंदिरात व्हीआयपी संख्या मर्यादित

    11-Jun-2026
Total Views |
 

ashadhi 
 
आषाढी एकादशीला महापूजेला अतिशय महत्त्वाच्या व्य्नती (व्हीआयपी) उपस्थित राहतात.त्यामुळे प्रशासनावर ताण पडताे. याबाबत साेलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नियमावली तयार केली आहे. त्याला शासनाची मंजुरी मिळाली की अतिशय महत्त्वाच्या व्य्नतींची संख्या मर्यादित हाेईल. यंदाची वारी संस्मरणीय करण्यासाठी सर्व शासकीय विभागप्रमुखांनी परस्परात याेग्य समन्वय ठेवावा. वारकरी, भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना विभागीय आयु्नत शीतल तेली-उगले यांनी दिल्या.आषाढी वारी अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत तेली-उगले यांनी या सूचना दिल्या. तत्पूर्वी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पुणे, सातारा, साेलापूर जिल्ह्यातील पालखी तळ, रिंगण साेहळ्याचे ठिकाण आदी पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्या.
 
या बैठकीला जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्यकार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर आयु्नत तुषार ठाेंबरे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियाेजन अधिकारी दिलीप पवार, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमाेल जाधव, मुख्याधिकारी महेश राेकडे; तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते.जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी वारीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या कामांची माहिती दिली. यावर्षी सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे तसेच मल्टीड्राेन वापर करून सुरक्षा यंत्रणेचा वापरही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अन्न व औषध प्रशासन विभाग दहा दिवस अगाेदर तपासणी माेहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.