नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखाेई-30 एमकेआयचे ऐतिहासिक लँडिंग

    11-Jun-2026
Total Views |
 

airport 
 
हवाई दलाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर आपले अत्याधुनिक सुखाेई-30 एमकेआय हे लढाऊ विमान यशस्वीरित्या उतरवून नवा इतिहास रचला.या विमानतळावर लढाऊ विमानाचे लँडिंग हाेण्याची ही पहिलीच वेळ आहे.सुखाेई विमान धावपट्टीला स्पर्श करताच त्याचा प्रचंड आवाज आणि गर्जनेने संपूर्ण आकाश थरारून गेले. या यशस्वी चाचणीमुळे हवाई दलाची रणनीतिक लवचिकता आणि देशाची वाढती एराेस्पेस ताकद जगासमाेर आली आहे.हवाई दलाच्या दक्षिण-पश्चिमी विभागाच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल आनंद व्य्नत केला. हवाई दल आणि देशाच्या विमान क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण आहे. सुखाेई-30 एमकेआयच्या या यशस्वी लँडिंगमुळे आमच्या ऑपरेशनल क्षमतेचे प्रदर्शन झाले आहे, असे हवाई दलाने स्पष्ट केले. नवी मुंबई विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी सज्ज हाेत असतानाच हवाई दलाच्या लढाऊ विमानाची ही चाचणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.