यश, अपयशात एकाच पायरीचं अंतर

    10-Jun-2026
Total Views |
 

success 
 
यशस्वी माणसांचा एक सर्व्हे करण्यात आला.त्यात असं लक्षात आलं की, अपयश हे यशाच्या एक पाऊल मागे असतं. अपयशातच यश लपलेलं असते. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल, तर अपयशाची संख्या वाढली तरी चालेल, पण प्रयत्न करत रहा. ताे पर्यत प्रयत्न करत रहा जाे पर्यत तुम्ही त्यात यश मिळवत नाही, नशीब म्हणून ते कार्य तसंच अर्धवट साेडू देऊ नकात. तुम्हाला जर एखादं काम चांगलं वाटलं आणि त्यात यशस्वी हाेणार असाल तर तुम्हाला विश्वास वाटत असेल तर ते काम न्नकी करा. ते करताना आपलं ध्येय समाेर ठेवा.यातसुद्धा अपयशाचा सामना करावा लागला तरी विचलित हाेऊ नका. तुम्ही अपयशाला घाबरून लढालाच नाही तर ते अपयशापेक्षाही वाईट.
 
विहिर खणताना तुम्ही कधी बघितलं आहे का, कितीतरी खाली विहीर खणली जात असते, परंतु पाणी लागत नाही, तरीही व्य्नती काम थांबवत नाही आणखी -आणखी खणतच राहते.कारण या व्य्नतीचं ध्येये असते पाणी! पाणी लागत नाही ताेपर्यत ती खणत जाते. जेव्हा ती व्य्नती थांबते तेव्हा तिच्या मनात विचार येताे की एवढी खणली, थाेडे अजून प्रयत्न करू या, कुणास ठाऊक एक कदाचित या थाेड्याच अंतरावर पाणी लागणार असेल तर असा विचार करत ती व्य्नती प्रयत्न सुरूच ठेवते आणि खूप मेहनतीनंतर त्याच्या प्रयत्नाला यश येतं. असं अनेकदा घडतं. की यश आणि अपयशात अगदी एका पायरीचं किंवा एका फुटाचंचं अंतर असतं.तेवढं पार करण्याचा प्रयत्न करणार एवढा संयम यश हवं असलेल्या प्रत्येकात असावा, यश तुमचचं आहे.