हा आठवडा तुमच्यासाठी याेजना व्यवस्थित करण्याचा, मेहनतीचे परिणाम मिळवण्याचा व आत्मविश्वास वाढवणारा राहील. तुम्ही तुमची कामे जिद्दीने व हुशारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. दीर्घकाळ रखडलेल्या कामात हळू हळू सुधारणा हाेताना दिसेल. आर्थिक स्थिती संतुलित राहील.
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा कार्यक्षेत्रात तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येऊ शकताे. नाेकरदारांच्या कार्यशैलीची व शिस्तबद्धतेची प्रशंसा हाेईल. एखाद्या नव्या प्राेजे्नटची जबाबदारी मिळू शकते. व्यापार करणाऱ्यांसाठी काळ नेहमीपेक्षा उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा हाेईल.
नातीगाेती : नात्यांबाबत या आठवड्यात समजुतदारपणा व सहयाेगाचा राहील.जीवनसाथीसाेबत उत्तम ताळमेळ असेल तसेच घरातील वातावरण सुखद असेल.प्रेमसंबंधात भावनिक जवळीक मजबूत हाेईल. अविवाहितांसाठी एखाद्या नव्या नात्याची श्नयता आहे. कुटुंबासाेबत वेळ घालवणे मन प्रसन्न करील.
आराेग्य : आराेग्याच्या दृष्टीने या आठवड्यात थाेडी सावधगिरी बाळगायला हवी. अनियमित खाण्या-पिण्यामुळे पाेटासंबंधित त्रास हाेण्याची श्नयता आहे.पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे तसेच बाहेरचे खाणे टाळावे. याेग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम तुम्हाला नवी ऊर्जा देईल.
शुभदिनांक : 02, 03, 06
शुभरंग : पांढरा, क्रीम, आकाशी
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात अतिविचार व चिंता करणे आपला आत्मविश्वास कमी करू शकते. इतरांच्या टिकेकडे जास्त लक्ष देऊ नये.
उपाय : बुधवारी श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करा. गरजू लाेकांना हिरवे मूग दान करावेत. ॐ गं गणपतये नम: मंत्राचा जप करावा