तमिळनाडूत कृष्णागिरी-हाेसुर भागामध्ये शेतांमध्ये रात्रीच्या वेळी हजाराे एलईडी बल्ब प्रकाशित हाेत आहेत. ती काेणती सजावट नाही, तर ‘स्मार्ट शेती’चे एक उत्कृष्ट टे्निनकआहे. याला ‘फाेटाेपीरियड कंट्राेल’ म्हटले जाते. या प्रकाशित बल्बच्या मदतीने राेपांचा विकास आणि फुले येण्याच्या प्रक्रियेला नियंत्रित केले जाते. खरे तर शेवंती, गुलाब आणि जरबेरा अशा फुलांच्या राेपांवर फुले येण्यासाठी सातत्याने जास्त वेळ अंधाराची गरज असते. रात्रीच्या वेळी लाइट लावून फुलझाडांच्या ‘नाइट सायकल’ला (सातत्याने अंधार) ताेडले जाते. त्यामुळे राेपावर फुले उमलण्याऐवजी जास्त काळ आपल्या ‘ग्राेथ स्टेज’ (वाढीची अवस्था) मध्ये राहतात. शेतकरी बाजारात चांगला भाव आणि ग्राहकांची मागणी यानुसार या टे्निनकचा वापर करतात. ज्यामुळे राेपांमध्ये अशा वेळी फुले येतील, जेव्हा बाजारात त्यांची मागणी जास्त असेल. त्याशिवाय हे टे्निनक पिकांचे कीटकांपासून संरक्षण करते. त्यामुळे पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन यातही वाढ हाेते. जपान आणि नेदरलँड्स अशा देशांमध्ये या टे्निनकचा वापर आधीपासून हाेत आहे. हाेसुर भागातील सुमारे 500 एकर क्षेत्रात शेतकरी काेणत्याही सरकारी मदती शिवाय या नवीन टे्निनकचा वापर करत आहेत.