वृषभ

    01-Jun-2026
Total Views |

horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी धैर्य व सकारात्मक बदल घेऊन येत आहे. तुम्ही तुमची कामे पूर्ण हुशारीने व शांतपणे पुढे न्याल ज्याचे उत्तम परिणाम मिळतील. दीर्घकाळापासून चालत आलेला त्रास कमी होईल. आर्थिक बाबतीत स्थिती उत्तम राहील पण खर्चावर ताबा ठेवायला हवा.
 
■ नोकरी / व्यवसाय या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. नोकरदारांवर नवी जबाबदारी टाकली जाऊशकते. तुमच्या कामाची गुणवत्ता वरिष्ठांना प्रभावित करील. व्यापार करणाऱ्यांसाठी आठवडा लाभदायक राहील. जुन्या ग्राहकांकडून फायदा मिळेल.
 
■ नातीगोती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये विश्वास व आपुलकी वाढेल. जीवनसाथीसोबतच्या संबंधात माधुर्य राहील. प्रेमसंबंधात स्थैर्य येईल आणि भविष्याबाबत चर्चा होऊ शकते. अविवाहित मंडळींसाठी उत्तम स्थळ चालून येण्याचेसंकेत आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील..
 
■ आरोग्य : या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील पण खाण्यापिण्यात बेपर्वाई वाढू शकते. सर्दी वा पचनासंबंधित त्रास होऊ शकतो. नियमित व्यायामव संतुलित जेवण करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. पुरेसे पाणी प्यावे तसेच रात्री उशीरपर्यंत जागणे तुम्ही टाळायला हवे.
 
शुभदिनांक : ०२,०३,०६
 
■ शुभरंग पांढरा, क्रीम, आकाशी
 
■ शुभवार बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
■ दक्षता हट्ट व आळस तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतो. आर्थिक व्यवहारात घाई करू नये.
 
उपाय : शुक्रवारी लक्ष्मीमातेला पांढरे फूल अर्पण करावे. गरजूंना तांदूळ वा मिठाई दान करावी. घरात सुगंधी वातावरण ठेवावे.