धनु

    01-Jun-2026
Total Views |
 

horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी नव्या अपेक्षा, भाग्याची साथ व पुढे जाण्याची संधी घेऊन आला आहे. या काळात तुमच्यात उत्साह व सकारात्मक विचार राहतील. ज्यामुळे तुम्ही तुमची कामे आत्मविश्वासाने पार पाडाल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील.
 
 नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचे संकेत देत आहे.नाेकरदारांना नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. एखादी नवी संधी व प्राेजे्नटमुळे लाभ हाेऊ शकताे. व्यापाऱ्यांसाठी काळ अनुकूल राहील. नवे संपर्क फायदेशीर ठरतील.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांत माधुर्य व आपुलकी राहील.जीवनसाथीसाेबत उत्तम समज विकसित हाेईल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल.अविवाहितांसाठी स्थळे चालून येतील. संततीची इच्छा धरणाऱ्या दांपत्याची इच्छा पूर्ण हाेईल. वडिलांच्या तब्बेतीबाबत सावध राहावे.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील पण, अधिक धावपळ व दगदग झाल्यामुळे तुम्हाला थकवा येण्याची श्नयता आहे. कंबर व पाय दुखण्यची श्नयता आहे. त्यामुळे पुरेसा आराम करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम व संतुलित आहार तुमच्यासाठी फायदेशीर असेल.
 
 शुभदिनांक : 31, 04, 05
 
 शुभरंग : लाल, नारंगी, साेनेरी
 
 शुभवार : रविवार, मंगळवार, गुरुवार
 
 दक्षता : या आठवड्यात अतिआत्मविश्वासाने काेणताही जाेखमीचा निर्णय घेऊ नये.
 
 उपाय : या आठवड्यात गुरुवारी श्रीविष्णूची पूजा करावी. पिवळ्या वस्तू दान कराव्यात आणि ॐ नमाे भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा