राज्यातील मत्स्य विक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत फिश वेंडिंग ई-रिक्षा माॅडेल राबवण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर करावा. या याेजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी येथे दिली.मंत्रालयात मत्स्यव्यवसाय विभागाच्या फिश वेंडिंग स्टाॅल याेजनेंतर्गत लाभार्थ्यांना 90 ट्नके अनुदान देण्याबाबत व ई-रिक्षा आधारित माॅडेल राबवण्यासंदर्भात आयाेजित बैठकीत राणे बाेलत हाेते. यावेळी आमदार चंदू यावलकर, मत्स्यव्यवसाय आयु्नत प्रेरणा देशभ्रतार, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, संबंधित अधिकारी उपस्थित हाेते. राज्यातील मच्छिमारांना पारंपरिक विक्री पद्धतीतून आधुनिक आणि स्वच्छ व्यवसाय माॅडेलकडे नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. फिश वेंडिंग ई-रिक्षा याेजनेमुळे मत्स्यविक्री व्यवसायाला नवे स्वरूप मिळेल. ग्राहकांना दर्जेदार मासळी उपलब्ध हाेईल, तर मच्छिमारांचे उत्पन्न वाढण्यासही मदत हाेईल. ग्रामीण आणि शहरी भागात मत्स्य विक्रीची साखळी अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे राणे यांनी सांगितले.