शैक्षणिक धाेरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय टास्क फाेर्स स्थापन : पाटील

    01-Jun-2026
Total Views |
 

patil 
 
राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणानुसार राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांत चारवर्षीय पदवी अभ्यासक्रम, अ‍ॅकेडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी), मेजर-मायनर पद्धती, इंटरर्नशिप, इंडियन नाॅलेज सिस्टिम (आयकेएस); तसेच काैशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध शैक्षणिक, प्रशासकीय व तांत्रिक बाबींमध्ये एकसमान मार्गदर्शनाची आवश्यकता लक्षात घेऊन विशेष टास्क फाेर्स स्थापन करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.या टास्क फाेर्सच्या अध्यक्षपदी डाॅ. नितीन करमळकर यांची नियु्नती करण्यात आली आहे. तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचा समावेश यात करण्यात आला आहे.