अकबर म्हणाला, ‘पाहिलं? तिथं सुईपण पुरेशी हाेती. तेवढं बाेललाे ही सुद्धा जास्त शिक्षा झाली. तेही जास्त व्हावं असाच ताे माणूस हाेता.तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती.एवढे म्हणणे हीच शिक्षा पुरेशी हाेती.इतकेच काय तीसुद्धा जास्तच झाली.ज्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा थाेडा तरी बाेध असताे त्याच्यासाठी आहे त्याला बघून या.’ ते सगळे तिथे गेले.त्यांना तुरुंगाच्या अधिकाऱ्याने म्हटले, ‘ताे इथं सगळ्यांना लाच देऊन पलायनाची याेजना बनवताे आहे.’ त्याला ते भेटले. ताे उदास दिसला नाही.
त्यांनी त्याला म्हटले, ‘मरेपर्यंत सक्तमजुरी उदास नाही वाटत?’ ताे म्हणाला, ‘शिक्षा गेली खड्ड्यात. या जगात सगळं काही हाेत असतं. मी काय कायम तुरूंगात राहीन हाेय? निघणारच. जिथं सगळं काही श्नय असतं, तिथं काय म्हणून मी कायमचा तुरूंगवास राहीन? दाेनचार दिवसात आपण भेटू बाहेर. तिकडे इतकंच काय पंधरा-वीस दिवसात तुम्ही बघाल मी दरबारात हजर असेन. तुम्ही काही एक चिंता करू नका. मी कसा झटपट सुटताे बघा तरी, अहाे नाही तरी फारच थकलाे हाेताे. चला पंधरा-वीस दिवस विश्रांती मिळाली.’ त्या लाेकांना माेठे आश्चर्य वाटले. आयुष्यभराची शिक्षा ठाेठावली गेली आहे, अन् हा असं म्हणत आहे.
अन् ज्याला तुमच्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती एवढेच म्हटले हाेते त्याने फास लावून आत्महत्या केली. अकबराने जेवढे बराेबर तेवढेच म्हटले. त्याहून कणभरही जास्त नाही म्हटले. कर्मामध्ये सम्यक प्रयत्न असे ज्याला म्हणावे ते त्याने बराेबर साधले असे म्हणायला पाहिजे.सर्व साधना सम्यकवर आधारित असते. आपल्या कर्मामध्ये सम्यक प्रयत्न असला पाहिजे हे याेग्याने तरी निदान कटाक्षाने पाळले पाहिजे. बुद्धांनी तर सम्यक हाेण्यासाठी व्यवस्था दिली. अष्टांग मार्ग असे बुद्ध ज्याला म्हणतात ताे सगळा सम्यकवरच आधारित आहे. त्यामध्ये सम्यक व्यायाम, सम्यक श्रम, सम्यक स्मृती, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान वगैरे सगळ्या गाेष्टी सम्यक असल्या पाहिजेत यावर त्यांचा भर अ