एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी 10 वर्षांची मर्यादा

    01-Jun-2026
Total Views |
 
 

MBBS 
 
वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नऊ वर्षांची असलेली कालमर्यादा वाढवून 10 वर्षांची करण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयाेगाने (एनएमसी) घेतला आहे. नव्या नियमानुसार या 10 वर्षांत चक्राकार वैद्यकीय आंतरवासिता अनिवार्य करण्यात आली आहे. या संदर्भात एनएमसीने ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन (अमेंडमेंट) रेग्युलेशन्स-2026 या अधिसूचनेचा मसुदा जाहीर केला आहे.आयाेगाच्या या नव्या दुरुस्तीमुळे एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता दहा वर्षांची मुदतमिळणार आहे.यात अनिवार्य राेटेटरी मेडिकल इंटर्नशिपचाही समावेश असेल.यापूर्वी ही मर्यादा नऊ वर्षांची हाेती. आयाेगाने 18 मे राेजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन्स-2023मधील कलम-5 अंतर्गत असलेल्या तरतुदीत बदल करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार प्रथम एमबीबीएस वर्षासाठी विद्यार्थ्यांना चार प्रयत्नांपेक्षा अधिक संधी दिली जाणार नाही; मात्र संपूर्ण पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठीची कालमर्यादा एका वर्षाने वाढवण्यात येणार आहे.
 
चार संधींमध्ये विद्यार्थी प्रथम वर्ष उत्तीर्ण न झाल्यास त्याला वैद्यकीय शिक्षण साेडावे लागेल. त्याचप्रमाणे एक वर्षाच्या आंतरवासितेसह विद्यार्थ्याने 10 वर्षांत वैद्यकीय शिक्षण पूर्ण न केल्यास त्याला एमबीबीएसची पदवी मिळणार नाही.म्हणजेच प्रथम एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यापासून आंतरवासितासह दहा वर्षांपेक्षा अधिक काळ वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम सुरू ठेवता येणार नसल्याचे नव्या मसुद्यात स्पष्ट करण्यात आले आहे.आयाेगाने या मसुदा दुरुस्तीवर संबंधित वैद्यकीय महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत. प्राप्त हाेणाऱ्या हरकतीसूचनांचा विचार करून अंतिम नियमावली जाहीर करण्यात येईल. सूचना आणि हरकती फ्नत ई-मेलद्वारे स्वीकारल्या जाणार असून, त्यासाठीugšgmeršamendš2026nmc. org.inहा अधिकृत ई-मेल आयडी देण्यात आला आहे