हा आठवडा तुमच्यासाठी संतुलन, नव्या संधी व आत्मविश्वासात वाढ घेऊन येणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या काम व वैयक्तिक जीवनात उत्तम ताळमेळ राखण्यात यशस्वी व्हाल. दीर्घकाळ अडलेल्या कामांना वेग येईल आणि मनात सकारात्मकता राहील.
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा कार्यक्षेत्रात नव्या यशाचे संकेत देत आहे. नाेकरदारांना आपले विचार मांडण्याची उत्तम संधी मिळेल व तुमच्या कार्यकुशलतेची प्रशंसा हाेऊ शकते. एखाद्या नव्या प्राेजे्नटची जबाबदारी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. भागीदारीतून फायदा हाेईल.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये माधुर्य आणि सामंजस्य टिकून असेल. जीवनसाथीसाेबत आपसातील जाणीव उत्तम हाेईल. प्रेमसंबंधात जवळीक वाढेल. अविवाहित जातकांसाठी एखाद्या नव्या नात्याच्या प्रारंभाचे संकेत मिळू शकतात. मित्रांसाेबत वेळ घालवणे मन प्रसन्न करील.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील पण तुम्हाला मानसिक तणाव व अनियमित दिनचर्येमुळे थकवा आणि पाठदुखी सतावण्याची श्नयता आहे. त्यातून मुक्त हाेण्यासाठी तुम्ही पुरेशा प्रमाणात झाेप घ्यायला हवी आणि खाण्या-पिण्यात सकस व समताेल आहार घ्यावा.
शुभदिनांक : 02, 03, 06
शुभरंग : पांढरा, क्रीम, आकाशी
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात इतरांचे ऐकून माेठा निर्णय घेऊ नये व आर्थिक व्यवहारात सावध राहावे.
उपाय : शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा करावी. सुगंधित फूल अर्पण करावे आणि ॐ श्रीं महालक्ष्मै नम: मंत्राचा जप करावा.