सिंह

    01-Jun-2026
Total Views |
 
 

horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि नव्या संधी घेऊन आला आहे. तुमच्यातील ऊर्जा व उत्साह टिकून राहील. ज्यामुळे तुमची अपुरी कामे वेगाने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. समाजात व कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा मजबूत हाेईल आणि लाेक तुमच्या विचार व नेतृत्वक्षमतेने प्रभावित हाेतील.
 
 नाेकरी/व्यवसाय : कार्यक्षेत्रात हा आठवडा तुमच्यासाठी यशाच्या नव्या संधी घेऊन येईल. नाेकरदारांना त्यांच्या कामामुळे सन्मान व प्रशंसा लाभू शकते.एखादी नवी जबाबदारी वा पद मिळू शकते. व्यापार करणाऱ्यांसाठी हा आठवडा लाभदायक राहील. नवे संपर्क जाेडले जातील व ते फायदेशीर असतील.
 
 नातीगाेती : या आठवड्यात नात्यांमध्ये प्रेम व विश्वास वाढेल. जाेडीदारासाेबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात गाेडवा राहील व संबंध मजबूत हाेईल. अविवाहितांसाठी एखाद्या नव्या नात्याची सुरुवात हाेण्याचे संकेत आहेत. धार्मिक सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी लाभेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील, पण जास्त धावपळ आणि कामाचे दडपण तुमचा थकवा वाढवू शकते. या आठवड्यात तुम्ही सावध राहायला हवे. नियमित याेगाभ्यास आणि वेळेवर खाणे-पिणे ठेवावे. यामुळे त्रास टाळू शकाल. एकूणच आराेग्याबाबत आठवडा संमिश्र फळ देणारा असेल.
 
 शुभदिनांक : 31, 04, 05
 
 शुभरंग : लाल, नारंगी, साेनेरी
 
 शुभवार : रविवार, मंगळवार, गुरुवार
 
 दक्षता : या आठवड्यात अहंकार व रागावर नियंत्रण ठेवावे. इतरांचे बाेलणे दुर्लक्षिणे हानी करू शकते.
 
 उपाय : या आठवड्यात सूर्याला अर्घ्य द्यावा आणि गहू व गूळ दान करावेत.आदित्य हृदय स्राेत वाचावे.