मीन

    01-Jun-2026
Total Views |

horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी मानसिक शांती, रचनात्मकता आणि आर्थिक प्रगती घेऊन आला आहे. या काळात तुम्ही तुमचे विचार व भावना उत्तम प्रकारे समजू शकाल. दीर्घकाळापासून मनात चालणाऱ्या गुंत्यात हळू हळू स्पष्टपणा येईल आणि अनेक कामांचे सकारात्मक परिणाम मिळण्यास सुरुवात होईल.
 
■ नोकरी / व्यवसाय हा आठवडा तुमच्या कार्यक्षेत्रात नव्या संधी घेऊन येऊ शकतो. नोकरदारांना एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. वरिष्ठांकडून मदत मिळेल. व्यापार करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. जुनी अडलेली कामे पूर्ण करू शकता व नव्या गुंतवणुकीतूनही फायदा होईल.
 
■ नातीगोती या आठवड्यात नात्यांमध्ये प्रेम व भावनिक जिव्हाळा राहील.जीवनसाथीसोबत संबंध मधुर राहतील व आपसातील सामंजस्य मजबूत होईल. प्रेमसंबंधात जवळीक वाढेल. अविवाहित मंडळींची एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. मित्रांसोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील.
 
■ आरोग्य या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील, पण मानसिक तणाव व जास्त विचार यामुळे थकवा जास्त जाणवेल. पुरेसा आराम करावा व तुमची दिनचर्या संतुलित ठेवावी. योग, ध्यान आणि सकाळी फिरायला जाणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. खाण्या-पिण्यात बेपवाई करू नये.
 
■ शुभदिनांक : ३१, ०४०५
 
शुभरंग लाल, नारंगी, सोनेरी
 
■ शुभवार : रविवार, मंगळवार, गुरुवार
 
■ दक्षता या आठवड्यात भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. आर्थिक व्यवहारात कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये..
 
■ उपाय : या आठवड्यात गुरुवारी श्रीविष्णूची पूजा करावी. पिवळ्या वस्तू दान कराव्यात आणि ॐ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा.