श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या ‘श्रीमंत’ काॅफी टेबल बुकचे प्रकाशन संपन्न

    01-Jun-2026
Total Views |
 
 

god 
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या ‘श्रीमंत’ या काॅफी टेबल बुकचे प्रकाशन नुकतेच मंदिरात झाले. ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक, आराेग्य क्षेत्रातील कार्याचा विस्तृत आढावा यात घेण्यात आला असून, ज्येष्ठ अभिनेते माेहन जाेशी यांच्या हस्ते हा प्रकाशन साेहळा पार पडला. या ग्रंथपुष्पाचे प्रायाेजकत्व वामन हरी पेठे ज्वेलर्सतर्फे करण्यात आले आहे. यावेळी वामन हरी पेठे ज्वेलर्सचे भागीदार आशिष पेठे, गाैरी पेठे, आदिवेद अ‍ॅडव्हर्टायझिंगचे संचालक व लेखक मिलिंद घैसास, कला संचालक स्वाती घैसास, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डाॅ. रामचंद्र तथा बाळासाहेब परांजपे, काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे साैरभ रायकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते. ट्रस्टचे सुरू असलेले सर्वच क्षेत्रांतील कार्य काैतुकास्पद असल्याचे माेहन जाेशी यांनी सांगितले.