मिथुन

    01-Jun-2026
Total Views |
 
 
 
horoscope
 
हा आठवडा तुमच्यासाठी नवे विचार, रचनात्मकता व सकारात्मक बदल घेऊन येत आहे. तुमच्यात काही नवे करण्याची इच्छा जाेल व तुम्ही तुमच्या विचारांनी लाेकांना प्रभावित करण्यात यशस्वी राहाल. दीर्घकाळापासून अडकलेल्या कामांना वेग येईल.
त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
 
 नाेकरी/व्यवसाय : कार्यक्षेत्रात हा आठवडा तुमच्यासाठी नव्या संधी घेऊन येऊ शकताे. नाेकरदारांना प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाची स्तुती करतील. एखाद्या नव्या याेजनेत वा प्राेजे्नटमध्ये यश मिळण्याची श्नयता आहे. व्यापाऱ्यांना नव्या संपर्कातून फायदा हाेईल.
 
 नातीगाेती : नात्यांबाबत हा आठवडा माधुर्य घेऊन येईल. जीवनसाथीसाेबत उत्तम ताळमेळ राहील आणि परस्पर सामंजस्य मजबूत हाेईल. प्रेमसंबंधात राेमांच व जवळीक वाढेल. अविवाहित जातकांची एखाद्या खास व्यक्तीशी भेट हाेण्याची श्नयता आहे. मित्रांसाेबत मानसिक आनंद लाभेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील. पण मानसिक ताण आणि धावपळीमुळे थकवा जाणवू शकताे. त्यामुळे तुम्ही पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. त्यासाेबतच तुम्ही तुमची दिनचर्या व्यवस्थित राखायला हवी. याेग आणि सकाळी फिरायला जाणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील.
 
 शुभदिनांक : 02, 03, 06
 
 शुभरंग : पांढरा, क्रीम, आकाशी
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : पूर्ण माहितीशिवाय काेणावरही विश्वास ठेवू नये. घाईगडबडीत घेतलेले निर्णय हानी पाेहाेचवू शकतात.
 
 उपाय : बुधवारी श्रीगजाननाला दुर्वा वाहाव्यात, हिरवे मूग दान करावेत आणि ॐ गं गणपतये नम: चा जप करावा.