देशातील पहिला एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडीत खासगी गुंतवणुकीतून साकारत असून, या प्रकल्पामुळे कचरामु्नत शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 1200 टन कचऱ्यावर प्रक्रिया हाेऊन 28 टन प्रतिदिन गॅसची निर्मिती हाेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.भांडेवाडी परिसरात केवा सुसबडे या आंतरराष्ट्रीय उद्याेगसमूहातर्फे शहरात राेज निर्माण हाेणाऱ्या 1200 टन कचऱ्यावर प्रक्रिया हाेणार आहे. या प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.यावेळी पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री कृष्णा खाेपडे, प्रवीणदटके, महापाैर नीता ठाकरे, उपमहापाैर लीना हातीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दानी, आयु्नत डाॅ. विपीन इटनकर, केवा सुसबडे प्रकल्पाच्या कार्यकारी संचालक रुंदा ठाकूर, फायनान्स डायरेक्टर विनाेद तणदाेन, उपाध्यक्ष विजय चिपळूणकर आदी उपस्थित हाेते.
एकीकृत शहर घनकचरा प्रक्रियाकेंद्र तीन टप्प्यांत पूर्ण हाेणार असून, येत्या ऑगस्टपर्यंत शहरातील 1200 टन कचऱ्यावर आधुनिक पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकल्पात ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया हाेणार आहे. या प्रक्रियेनंतर बायाेगॅस, कंपाेस्ट खत; तसेच सुक्या कचऱ्यापासून पावर प्लेट्स इंधन तयार हाेईल.देशातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी नागपूर महापालिकेने 30 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. गॅसच्या विक्रीतून नागपूर महापालिकेला दरवर्षी 15 लाखांची राॅयल्टीही मिळणार आहे. पर्यावरणपूरक या प्रकल्पासाठी प्रशासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.