मकर

    01-Jun-2026
Total Views |
 

horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी परिश्रम, शिस्त व हळू हळू मिळणाऱ्या यशाचा संकेत घेऊन आला आहे. यादरम्यान तुम्ही तुमच्या लक्ष्यांबाबत गंभीर राहाल.आणि प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडाल. सुरुवातीला कामाचा दबाव जास्त जाणवेल पण तुमची मेहनत व धैर्यपूर्ण विचार तुम्हाला पुढे जाण्यास मदत करील.आर्थिक स्थिती संतुलित राहील.
 
 नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. नाेकरदारांना एखाद्या महत्त्वाच्या कामची वा प्राेजे्नटची जबाबदारी मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित राहतील. व्यापाऱ्यांना काळासाेबत लाभ वाढत राहील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा हाेईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये स्थैर्य व जाण राहील.जीवनसाथीचे सहकार्य लाभेल. घरगुती वातावरण सुखद राहील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक निर्माण वाढेल. अविवाहित जातकांसाठी उत्तम स्थळांकडून प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबासाेबत वेळ घालवल्यामुळे मानसिक शांती लाभेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील, पण जादा कामामुळे थकवा व अशक्तपणा जाणवू शकताे. हाडे, सांधे वा कंबरेसंबंधित समस्या असणाऱ्यांनी विशेष सावध राहावे. नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी विश्रांती घेणे तुमच्यासाठी गरजेचे आहे.
 
 शुभदिनांक : 02, 03, 06
 
 शुभरंग : पांढरा, क्रीम, आकाशी
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात कामाच्या दबावापायी आराेग्याकडे दुर्लक्ष करू नये.
 
 उपाय : या आठवड्यात शनिदेवाला सरसू तेल वाहावे आणि ॐ शनैश्चराय नम: मंत्राचा 108 जप करावा. काळे तीळ दान करावेत.