कर्क

    01-Jun-2026
Total Views |

horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी भावनिक संतुलन, कौटुंबिक सुख व आत्मविश्वासात वृद्धी घेऊन येत आहे. या काळात आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक जीवनाकडे जास्त लक्ष द्याल. तुम्हाला तुमची अर्धवट कामे पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल. अनेक बाबतीत सकारात्मक बदल पाहायला मिळतील.
 
नोकरी / व्यवसाय : कार्यक्षेत्रात हा आठवडा जबाबदाऱ्यांनी भरलेला राहणार आहे, पण तुम्ही हुशारीने व धैर्याने त्या यशस्वीपणे पार पाडाल. नोकरदारांना नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. ज्याचा भविष्यात फायदा होईल. व्यापाऱ्यांना हा काळ हळू हळू प्रगतती देणारा आहे.
 
नातीगोती : या आठवड्यात तुमच्या कुटुंबात आपुलकी आणि भावनिक जिव्हाळा वाढेल. जीवनसाथीचे सहकार्य लाभेल आणि कौटुंबिक बाबतीत सामंजस्य राहील. प्रेमसंबंधात विश्वास व जाण मजबूत होईल. अविवाहित मंडळींसाठी एखाद्या नव्या नात्याच्या सुरुवातीचे संकेत आहेत.
 
आरोग्य : या आठवड्यात तुम्ही तुमचे आरोग्य सामान्य राहील पण खाणेपिणे आणि दिनचर्येकडे लक्ष द्यायला हवे. तुम्हाला अपचनाची व गॅस होण्याची समस्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तेलकट खाद्यपदार्थ खाणे बंद करायला हवे व घरचा सकस आहार घ्यावा.
 
■ शुभदिनांक ३१,०४,०५
 
शुभरंग लाल, नारंगी, सोनेरी
 
शुभवार : रविवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता या आठवड्यात भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये व इतरांचे बोलणे मनाला लावून घेऊ नये.
 
उपाय : सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करावे, तांदूळ वा दूध दान करावे आणि ॐ नमः शिवाय चा जप करावा