मेष

    01-Jun-2026
Total Views |
 

horoscope 
हा आठवडा मेष राशीच्या जातकांसाठी नव्या संधी आणि आत्मविश्वासाने भरलेला राहणार आहे. दीर्घकाळापासून कामांबाबत असलेला गाेंधळ संपेल. तुमची सक्रियता व मेहनत तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवण्यात मदत करील. काही नव्या याेजनांमुळे फायदा हाेईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
 
 नाेकरी/व्यवसाय : कामकाजात हा आठवडा प्रगती देणारा ठरू शकताे.नाेकरदार त्यांच्या प्रदर्शनाने प्रशंसा मिळवू शकतात. तुमची कार्यशैली व सल्ला वरिष्ठांना प्रभावित करील. नव्या जबाबदाऱ्या मिळाल्यामुळे प्रतिमा मजबूत हाेईल.व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा नवे संपर्क व नव्या संधी आणू शकताे.
 
 नातीगाेती : नात्यांबाबत हा आठवडा सुखद राहील. जीवनसाथीसाेबत ताळमेळ उत्तम राहील. प्रेमसंबंधात भावनिक जवळीक वाढेल. जे जातक अविवाहित असतील त्यांना एखादी खास व्यक्ती भेटू शकते. कुटुंबासाेबत घालवलेला वेळ तुमच्या मनाला समाधान देईल.
 
 आराेग्य : आराेग्याबाबत बेपर्वाई करणे याेग्य नव्हे. कारण हा आठवडा तुमच्यासाठी थाेडासा त्रासदायक ठरणारा आहे. कामाच्या वाढत्या व्यापामुळे शरीरात थकवा व अशक्तपणा जाणवू शकताे. वेळेवर जेवण करावे आणि पुरेशी झाेप घ्यावी. याेग व हलका व्यायाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
 
 शुभदिनांक : 31, 04, 05
 
 शुभरंग : लाल, नारंगी, साेनेरी
 
 शुभवार : रविवार मंगळवार, गुरुवार
 
 दक्षता : या आठवड्यात इतरांचे ऐकून घाईत निर्णय घेऊ नयेत. राग व अहंकारावर ताबा ठेवावा.
 
 उपाय : मंगळवारी हनुमान मंदिरात दिवा लावावा व राेज हनुमान चालिसा वाचावी. गरजूंना लाल वस्त्र वा अन्न दान करावे.