या आठवड्यात तुमच्यासाठी नवे विचार, रचनात्मक ऊर्जा आणि सकारात्मक बदल घेऊन येत आहे. या काळात तुम्ही तुमची कामे वेगळ्या विचार व नव्या योजनांसह पुढे नेण्याचा प्रयत्न कराल. तुमची बुद्धिमत्ता व दूरदर्शीपणा तुम्हाला अनेक बाबतीत इतरांपेक्षा पुढे ठेवील.
■ नोकरी / व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुमच्यासाठी अनेक संधी चालून येतील. नोकरदारांना एखाद्या नव्या प्रोजेक्ट वा जबाबदारीत सामील होण्याची संधी मिळेल. तुमची कार्यशैली व रचनात्मक विचार वाखाणले जाऊ शकतात. व्यापाऱ्यांना नव्या संपर्कातून फायदा होईल.
■ नातीगोती या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये विश्वास आणि समजुतदारपणा असेल. जीवनसाथीसोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात पारदर्शकता आणि भावनिक जवळीक राहील. अविवाहित जातकांसाठी एखाद्या नव्या नात्याचा संकेत आहे. मित्र व कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील.
■ आरोग्य : या आठवड्यात आरोग्य सामान्य राहील, पण अनियमित दिनचर्या आणि अधिक विचारामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्यावी आणि योग आणि ध्यानाला आपल्या दिनचर्येचा भाग बनवावा. पाणी जास्त प्यावे आणि खाणेपिणे संतुलित राखावे.
■ शुभदिनांक : ०२, ०३, ०६
शुभरंग पांढरा, क्रीम, आकाशी
■ शुभवार बुधवार, शुक्रवार, शनिवार
■ दक्षता : या आठवड्यात जास्त विचार करण्यात वेळ वाया घालवू नये. कोणत्याही कामात बेपर्वाई हानी करू शकते.
■ उपाय : या आठवड्यात शनिवारी शनिमंदिरात दिवा लावावा. गरजूंना काळे तीळ वा कांबळे दान करावे तसेच ॐ शनैश्चराय नमः मंत्राचा १०८ जप करावा.