मत्सर भावनेचा त्याग करा!

    01-Jun-2026
Total Views |
 
 

anger 
मत्सराच्या खाेड्यात आपण अडकू नये यासाठी आपण आपले अंतर्मन स्वच्छ ठेवण्याची गरज असते.कारण आपल्या मनात मत्सराची भावना निर्माण झाली आहे हे देखील आपल्याला लवकर उमगत नाही.पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे राजा बेिफकीर असला की शत्रूने कधी राज्याला वेढा घातला आणि आपली पुरती काेंडी झाली आहे हे राज्याला ार उशीरा कळत असे त्याप्रमाणेच आपण गाील राहिलाे की, केव्हा आपल्याला मत्सराने ग्रासले आहे हे देखील कळत नाही.आयुष्यात मला जे काही मिळणार आहे त्यामागे माझे प्रयत्न, जिद्द, चिकाटी आणि बुद्धीमत्ता कारणीभूत असते हे पहिल्यांदा उमगले पाहिजे. हे उमगले तर मनात मत्सराची भावना निर्माण हाेणार नाही. दुसऱ्याकडे दाेषभावनेने न पाहता मला त्याच्याकडून शिकण्यासारखे काय आहे या भावनेने पाहिले पाहिजे. ते शक्य नसेलतर मग दुसऱ्याकडे पाहण्याऐवजी स्वतःकडे काटेकाेरपणे लक्ष दिले पाहिजे.
 
मत्सर हाताळायला सगळ्यात अवघड आणि फसवा आहे. अनेकवेळा माणसाला रागाच्या भरात चुकीचं वागल्यामुळे पश्चात्तापही हाेताे. थाेडक्यात काय तर त्याचं व्यवस्थापन करणं अवघड जरी असलं तरी गुलदस्त्यातलं नसतं. पण मत्सराच्या बाबतीत तसं नाहीये. जसं रागाच्या बाबतीत माणूस नंतर तरी राग आल्याचं मान्य करताे. मग चूक काेणाचीही असाे. पण आपल्यापैकी कितीजण मला या क्षणी त्या व्यक्तीचा प्रचंड मत्सर वाटताे आहे असे मान्य करतात? ही मत्सराची भावना कशी हाताळणार?मत्सराच्या भावनेचा स्वीकार करा आपल्याला दुसऱ्याचा मत्सर वाटताे हे मान्य करण्याची तयारी असली पाहिजे. आपल्याला मत्सर ही तशी क्लेष देणारी भावना वाटल्यामुळे जर आपण ती आपल्या मनातच रेंगाळत ठेवली तर ती प्राेसेस न झाल्यामुळे आपले बरंच काम वाढवून ठेवू शकते आणि नुकसान करु शकते. त्यामुळे स्वत:शी मत्सरासंबंधी अगदी ठळक वाक्यात संवाद साधायची सवय आपण लावून घेतली पाहिजे.
 
कारणांचा शाेध घ्या आपल्याला मत्सर काेणत्या कारणांमुळे वाटताे याचा आपणच विचार केला पाहिजे. मत्सर एक नकारात्मक भावना आहे आणि ती आपल्यामध्ये यायलानकाे हे जरी खरं असलं तरी तिचा शिरकाव आता झाला आहे. त्यामुळे त्याविषयी आत्मपरिक्षण केलेच पाहिजे.अंधानुकरण नकाे काेणाचंही अंधानुकरण करणं तसंही चांगलं नाही आणि केवळ मत्सरापाेटी बराेबरीच्या हेतूने करणं तर नाहीच नाही. आपण अगदी लहान मुलांनाही शिकवताे त्याच्याकडे आहे म्हणून तुझ्याकडे असायलाच पाहिजे असं नाही. तुला ते खरंच आवडलं असेल आणि तू ते मनापासून खेळणार असशील तर आपण ते घेऊ. पण नुसतं त्याची बराेबरी करण्यासाठी तू ते मागत असशील तर ते चुकीचं आहे.