नीता अंबानी साडी संस्कृतीच्या संरक्षक

    01-Jun-2026
Total Views |
 

Ambani 
 
जेव्हा रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी भारतीय संस्कृतीशी मिळतीजुळती साडी नेसून जागतिक स्तरावर विराजमान हाेतात, तेव्हा देशभरातून त्यांचे काैतुक हाेणे स्वाभाविक आहे. न्यूयाॅर्कमधील ‘टाइम 100 समिट’मध्ये ‘टाइम’च्या सीईओ जेसिका सिबली यांच्यासाेबत ‘लीडरशिप लेन्स’ या विषयावर चर्चा करत असताना, नीता अंबानींनी नेसलेली साडी आकर्षणाचे केंद्र बनली हाेती.ही बंगालची अप्रतिम आदिवासी लाेअर जामदानी साडी म्हणून ओळखली जाते. ही साडी फुलिया येथे पद्मश्री पुरस्कार विजेते बिरेन कुमार बास्के यांनी हाताने विणली हाेती.ही उत्कृष्ट कलाकृती तयार करण्यासाठी दाेन वर्षे लागली. या सहावारी साडीची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे. एका आशियाई अब्जाधीश आणि सेलिब्रिटीची पत्नी जागतिक स्तरावर साडी नेसून बसते, ही गाेष्टही काैतुकास्पद आहे.