हे सर्व जिभेच्या चाेचल्यांमुळे आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण घरातच लहान बाळाला पूर्णान्न देण्याऐवजी रेडीूड भरवले जाते. न्याहारीची जागा टू मिनिट्सच्या नूडल्सनी घेतली आहे.
काेराेनामुळे अनेक जणांना वर्क फ्राॅम हाेम करावे लागत असल्याने दिवसभर घरी बसून वाढत असलेलं वजन, त्यातच बऱ्याच वेळा बनवण्यात आलेले चमचमीत पदार्थ, या सगळ्यांचा परिणाम म्हणून वजन नियंत्रणात ठेवणं कठीण हाेऊन बसलं आहे. अशा परिस्थितीत वजन आटाेक्यात आहे अथवा नाही, याकडे नियमित लक्ष ठेवणं आवश्यक आहे. वजन खूप वाढल्यानंतर डाएट करून वजन नियंत्रणात आणणं शक्य असलं, तरीही शारीरिक आराेग्याच्या दृष्टीनं ते याेग्य नाही. त्यामुळे अतिप्रमाणात वजन वाढणार नाही, याची काळजी घेणं उत्तम!
झटपट-पटपटच्या जमान्यात ताजे अन्नपदार्थ खायचे साेडून आपण रेडीपाकीट व रेडीूडच्या मागे लागलाे आहाेत. सध्या स्वस्त मस्त जेवण बाजारात रेडी मिळत असले, तरी जीवनसत्त्वयुक्त क्षारयुक्त संतुलित आहार घेणे काळाची गरज आहे.
सकाळी उठल्यावर प्रत्येकाने दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करावी. त्यानंतर शक्य असल्यास बदाम, मनुके, अंजीर किंवा अक्राेडसारखे ड्राय्रुट्स घ्यावे. नाश्त्यासाठी ार वेळ न घेणारे व करायला साेपे पदार्थ आठवड्यासाठी आधीच ठरवावे. दुधात राजगिरा, ओटस्, माेड आलेली उसळ आदल्या दिवशी आणून ठेवणे शक्य असेल, तर आणून ठेवावी. सकाळी उसळ उकळून (उकडून) त्यावर तिखट, मीठ, चाट मसाला टाकून घेतल्यास पाैष्टिक नाश्ता हाेईल. अंडी चालत असतील, तर उकडलेले अंडे किंवा आमलेट करता येईल. यावरील पदार्थांसाठी स्वयंपाककरण्याचे काैशल्य आवश्यक नाही, फक्त नीट नियाेजन केले पाहिजे. गव्हाच्या ब्रेडचे सॅण्डविचसुद्धा करता येईल व जर स्वयंपाकाची आवड असेल, तर नक्कीच उपमा, शिरा, पाेहे इत्यादी पदार्थ करावे. वेळ खूप कमी लागताे किंवा खूप साेपे पडते म्हणून नेहमीच चहा बिस्किटे किंवा मॅगीसारखा नाश्ता करू नये. त्यातून कॅलरीज व्यतिरिक्त इतर ारसे पाेषकतत्त्वे मिळणार नाहीत.
दैनंदिन जीवनात दुपारच्या जेवणात ुलके-भाकरी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा समावेश असावा.साेबत काेशिंबीर, डाळ, उसळी, चिकन, मासे, दही, ताक असे जेवण असावे. पण, घरी किंवा ऑफिसमध्ये जाताना प्रत्येक वेळेस असा डबा नेणे शक्य नाही. मधल्या वेळेत चणे, बदाम, आक्राेड खावेत. कुरमुरे, ज्वारीच्या लाह्या साेबत न्याव्यात. चिक्की, राजगिरा, कुरमुरा लाडू खावा. यामुळे गाेड खायची तल्लफ कमी हाेते व अरबट चरबट खाण्याची गरज भासत नाही. दरराेज दूध प्यावे.आहारात ताक व दही यांचा समावेश असावा. साधा पाॅलिश भात खाण्यापेक्षा हातसडीचा लाल भात खावा.रिाइन्ड तेलाचा वापर कमी करून ऑलिव्ह ऑईल वापरावे. बाजारातील अतिमहाग साॅस, चटण्यांपेक्षा ते घरच्या घरी बनवाव्यात. त्यामुळे मिठाचे प्रमाणही नियंत्रणात राहाते. बाजारातील पॅकेट सूप पिण्यापेक्षा सूप व सलाडच्या साेप्या पाककृती शाेधून त्या कराव्यात.