हसा! गुलाब चाेहाे बाजूंनी काट्यांच्या कचाट्यात सापडलेले असतानासुद्धा हसणं साेडत नाही.प्रतिकूल परिस्थितीत हसलात, तर लाेक तुमच्यावर गुलाबाप्रमाणे प्रेम करतील.लक्षात घ्या-जिवंत मनुष्यच हसू शकताे.मृत्यू पावलेला नाही. हसणे हे केवळ मनुष्याच्या नशिबी आहे. तुम्हांला हसताना पाहून चार लाेक हसतील; पण तुम्हांला रडताना पाहून कुणीही रडणार नाही. रडताना तर किमान अश्रूंची तरी गरज भासते; पण हसताना तर तेही लागत नाहीत. मग, तुम्ही का हसत नाही?