असे अनेकदा म्हटले जाते की, बाळ नेहमी आईच्या हृदयात राहते. पण हे केवळ एक भावनिक सत्य नाही... आता विज्ञानानेही याची पुष्टी केली आहे.अलीकडील संशाेधनानुसार लक्षात आले की, बाळ जन्माला आल्यानंतरही, बाळाच्या पेशी आईच्या शरीरात उपस्थित राहतात. गर्भधारणेदरम्यान, दाेघांमध्ये पेशींची दुतर्फा देवाणघेवाण सुरू राहते.त्यामुळे जन्मानंतरही आई आणि बाळ एकमेकांचा एक भाग बनून राहतात.सिएटलच्या फ्रेड हचिंसन कॅन्सर सेंटरच्या संशाेधनातून असे दिसून आले आहे की, हे नाते इतके घट्ट आहे की जन्मानंतर 27 वर्षांनीही बाळाच्या जिवंत पेशी आईच्या रक्तात व अवयवांमध्ये आढळू शकतात.भ्रूणाच्या पेशी आईसाठी ‘दुरुस्ती किट’ माउंट सिनाई स्कूल ऑफ मेडिसिन आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफाेर्नियाच्या अलीकडील अभ्यासानुसार, या लहान पेशी शरीरात ‘लहान डाॅक्टर’प्रमाणे काम करतात.
आईच्या जखमी हृदयाची दुरुस्ती करतात आणि बाळाच्या राेगप्रतिकार शक्तीला भविष्यातील आजारांशी लढायला शिकवतात.एखादी स्त्री गर्भवती हाेते, तेव्हा नाळ केवळ अन्न पाेहाेचवण्याचे साधन नसते.गर्भाच्या पेशी गर्भधारणेच्या सहाव्या आठवड्यापासूनच आईच्या रक्तप्रवाहात प्रवेश करू लागतात. शास्त्रीयदृष्ट्या याला ‘फीटल माइक्राेकाइमेरिज्म’ म्हणतात. भ्रूणातून बाहेर पडणाऱ्या या विशेष पेशी आईच्या हृदय, फुप्फुसे, यकृत आणि मेंदूपर्यंत प्रवास करतात.माउंट सिनाई येथील संशाेधकांनी सांगितले की, या पेशी ‘दुरुस्ती किट’ प्रमाणे काम करतात.स्टेम सेलप्रमाणे करतात काम : आईच्या शरीरातील काेणत्याही अवयवाला इजा झाल्यास, त्या जीपीएस प्रमाणे त्या ठिकाणी पाेहाेचतात आणि जखम बरी करण्यास मदत करतात. यांना ‘प्रेग्नेंसी असाेसिएटेड प्राेजेनिटर सेल्स’ म्हणतात.त्या स्टेम सेलप्रमाणे कार्य करतात आणि गरजेनुसार आईच्या शरीरातील काेणत्याही पेशीमध्ये रूपांतरित हाेऊ शकतात.
कर्कराेगाशी लढण्यासाठीही मदत करतात या पेशी : फ्रेड हचिन्सन सेंटरच्या एका अभ्यासानुसार, कर्कराेगासारख्या आजारांमधील ट्यूमरशी लढण्यासही या पेशी मदत करतात असे दिसून आले आहे. विज्ञान या ‘पेशीय जादूचा’ उपयाेग रक्ताच्या गंभीर विकारांवर, जसे की अल्फा थॅलेसेमिया उपचार करण्यासाठी करत आहे. एकंदरीत, आई आणि बाळ यांच्यातील हे नाते निसर्गाच्या अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना आहे, जिथे दाेन जीव एकमेकांचे संरक्षण करण्यासाठी पेशीय स्तरावर खंबीरपणे एकत्र उभे राहतात.आईच्या पेशी बाळाच्या राेगप्रतिकार शक्तीला प्रशिक्षित करतात : संशाेधनात दिसून आले की, केवळ बाळाच्या पेशी आईमध्ये प्रवेश करत नाहीत; तर, आईच्या पेशीही बाळाच्या शरीरातही प्रवेश करतात. बॅनियाॅफ चिल्ड्रन्स हाॅस्पिटलच्या अहवालानुसार, आईच्या पेशी बाळामध्ये विकसित हाेत असलेल्या राेगप्रतिकार शक्तीसाठी प्रशिक्षक म्हणून काम करतात.लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्राॅपिकल मेडिसिनच्या एका अभ्यासानुसार, आई आपली ‘इम्यून मेमरी’ही मुलांना देते.