2. दुर्मती: श्रवणाने वाईट बुद्धीचा त्याग केला जाताे. कीर्तन, प्रवचन ऐकल्याने व्यक्ती आपल्या दुर्भावनांचा (खजील हाेऊन) त्याग करताे. मन:शुद्धी हाेऊन ताे सदाचारी बनताे. श्रीकृष्णाच्या बासरीतील दैवी संगीत ऐकून मनुष्यप्राणीच नव्हे तर पशूसुद्धा आपले क्राैर्य विसरत. अगदी वाघ-बकरीसुद्धा शेजारी बसून संगीत ऐकत. याचा अर्थ असा की, ‘सुजन वाक्य’ कानी पडल्यावर त्याचा प्रभाव झाल्याशिवाय राहत नाही.
3. ज्ञान: गुरुमुखातून ऐकलेल्या गाेष्टी सदैव लक्षात राहतात. नुसते ग्रंथ, पुस्तके वाचून नव्हे; तर शाळेत ‘गुरुजींकडून’ घेतलेले ‘धडे’ खरंच चांगले लक्षात राहतात.
4. माेक्ष: ‘गुरुमंत्र’ घेतल्याने ‘माेक्ष’ प्राप्त हाेताे. माेक्षाप्रत जाण्याचा मार्ग शाेधण्यासाठी त्या वाटेला प्रवासी, अधिकारी पुरुषाचा म्हणजेच गुरूचा ‘गुरुमंत्र’ घ्यावा लागताे. याच्या श्रवणभक्तीने माेक्षाची प्राप्ती हाेते. जन्म मरणाच्या ेऱ्यातून माणसाची मुक्तता हाेऊन परमसुखाची प्राप्ती हाेते.
बाेध : एकाग्रचित्ताने काेणतीही गाेष्ट श्रवण केल्यास ती मनाला भिडते; अंतर्मनात ठसते आणि तिचे अपार ायदे मि ळतात. अर्थात हे चांगल्या गाेष्टींचेच श्रवण असावे.