हा आठवडा तुमच्यासाठी नियाेजन, शिस्त व हुशारीने यश देणारा राहणार आहे. तुम्ही तुमची कामे व्यवस्थितपणे पूर्ण कराल ज्यामुळे उत्तम परिणाम मिळतील.कार्यक्षेत्रात तुमच्या परिश्रमाची वाहवा हाेईल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत पण खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामाचा वेग सामान्य राहील. पण हळूहळू प्रगती हाेईल. नाेकरदार जातकांनी आपल्या कामात एकाग्रता व शिस्त टिकवून ठेवायला हवी. वरिष्ठांकडून सहकार्य लाभैल.व्यापाऱ्यांना नव्या संधी मिळतील व जुन्या गुंतवणुकीतून फायदा हाेऊ शकताे.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या दांपत्यजीवनात सामंजस्य टिकून राहील. अविवाहित जातकांसाठी चांगल्या स्थळाचा प्रस्ताव येण्याची श्नयता आहे. कुटुंबासाेबत वेळ घालवल्यामुळे तुमचे मानसिक संतुलन टिकून राहील.नात्यामध्ये इमानदारी आणि स्पष्टपणा ठेवणे तुमच्या हिताचे राहील.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे शारीरिक आराेग्य उत्तम राहील पण पचनासंबंधित तसेच पाेटाच्या समस्या वाढण्याची श्नयता आहे. तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्याबाबत सावध राहायला हवे आणि नियमित दिनचर्या अवलंबायला हवी. प्राणायाम तुमच्यासाठी फायदेशीर राहील.
शुभदिनांक : 03, 06, 07
शुभरंग : हिरवा, क्रीम, गुलाबी
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात अत्याधिक चिंता व टीका करणे टाळा. अन्यथा मानसिक तणाव वाढू शकताे.
उपाय : बुधवारी श्रीगणेशाला दूर्वा अर्पण करून ॐ गं गणपतये नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा.