खंबाटकीतील नवीन बाेगदा चाचणीसाठी हाेणार खुला

    04-May-2026
Total Views |
 
 

tunnel 
पुणे-बंगळुरू महामार्गावरील दुसरा खंबाटकी बाेगदा चाचणीसाठी खुला करण्यात आला असून, त्यामुळे पुणेसातारा मार्गावरील प्रवाशांची वाहतूक सुखकर हाेणार आहे. लवकरच या बाेगद्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) सांगण्यात आले.या बाेगद्यामुळे खंबाटकी घाटातील धाेकादायक अवघड वळणे, वारंवार हाेणारी माेठी वाहतूक काेंडी, अपघात आणि वाहनांच्या नुकसानीपासून प्रवाशांची सुटका हाेणार आहे. या बाेगद्यामुळे साडेआठ कि.मी.चा घाट रस्ता बंद हाेणार आहे. नवीन बाेगद्यातील सहापदरी रस्त्यामुळे पुणे-सातारा मार्गावरील किमान अर्ध्या तासाचा वेळ वाचणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि गतिमान हाेणार आहे.खंबाटकी घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नव्याने सहापदरी बाेगद्याचे काम सुरू हाेते.
 
आता या बाेगद्याचे 86 टक्के काम पूर्ण झाले असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या सातारा दाैऱ्यात बाेगद्याचे उद्घाटन हाेण्याची शक्यता आहे. सध्या हा बाेगदा चाचणीसाठी खुला करण्यात आल्याचे ‘एनएचएआय’कडून सांगण्यात आले.नव्या बाेगद्यात सुधारित प्रकाशयाेजना, सीसी टीव्ही निगराणी, रुंद मार्गिका, परावर्तक आणि स्पष्टपणे चिन्हांकित आपत्कालीन प्रणाली यांसारख्या सुविधांमध्ये सुरक्षितता आणि साेयीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. जुन्या बाेगद्याच्या तुलनेत, हा बाेगदा अधिक रुंद असल्याचेही एनएचएआयकडून सांगण्यात आले.पुणे आणि सातारा दरम्यान या प्रकल्पामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यटक या दाेघांनाही फायदा हाेईल.