हा आठवडा तुमच्यासाठी धैर्याने व स्थिरपणे पुढे जाण्याचे संकेत देत आहे. तुम्ही तुमची कामे नियोजनपूर्वक पूर्ण कराल. ज्यामुळे उत्तम परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात तुमच्या परिश्रमाची प्रशंसा होईल. आर्थिक स्थिती हळू हळू सुधारेल. अनावश्यक खर्चाला मात्र आळा घालायला हवा.
■ नोकरी-व्यवसाय या आठवड्याची सुरुवात सामान्य राहील पण मध्यात कामाला वेग येईल. नोकरदारांनी आपल्या कामत सातत्य टिकवून ठेवायला हवे. वरिष्ठांची मदत मिळेल. व्यापाऱ्यांना जुन्या संपर्कातून फायदा होईल आणि व्यापारात तुमची विश्वसनीयता टिकून राहील.
नातीगोती : या आठवड्यात तुमच्या दांपत्य जीवनात स्थिरता आणि विश्वास टिकून राहील. अविवाहित जातकांसाठी एखादे उत्तम स्थळ चालून येण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील. नात्यांमध्ये स्पष्टपणा टिकवून ठेवाल तर सुख वाढेल.
आरोग्य : हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने सुखद परिणाम देणारा राहणार आहे. परंतु तुम्ही थंड पेय वा खाद्य पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण या आठवड्यात तुम्हाला सर्दी, खोकला तसेच घसादुखीचा त्रास सतावण्याची शक्यता दिसून येत आहे. तसेच पाणी उकळून थंड करून प्यावे.
शुभदिनांक ०३, ०६, ०७
शुभवार बुधवार, शुक्रवार, शनिवार
शुभरंग हिरवा, क्रीम, गुलाबी
दक्षता : या आठवड्यात हट्टीपणा व आळस टाळावा, अन्यथा हाती आलेली संधी जाऊ शकते.
उपाय : शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा करावी व पांढरी मिठाई अर्पण करावी आणि ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः चा १०८ वेळा जप करावा.