एक पुस्तक वाचत असताना, त्यात असे वाचनात आले की, ‘शंभर कामं बाजूला ठेवा; पण जेवण करा. हजार कामं दूर करून अंघाेळ करा. लाख कामं थांबवून दान करा आणि कराेडाे कामांना बाजूला सारून परमेश्वराचं स्मरण करा.’ आज मात्र सगळं काही उलटंच घडताना दिसतंय. शंभर कामं बाजूला ठेवा; पण पहिल्यांदा खाऊन घ्या. हजार कामं दूर सारा, पण झाेप घ्या. लाखाे कामं साेडा; पण कमवायचं थांबू नका आणि कराेडाे कामांना ाटा देऊन टीव्हीसमाेर बसा.